धुळे - गुरुव्दारा आवारातून देशी बनावटीच्या रायफलसह पिस्तुल जप्त
धुळे , 15 जानेवारी (हिं.स.) शहरात अवैध बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तुल, ३१५ रायफल व मॅगझिन असा एकूण ५ लाखांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा (३६) रा. गुरुद्वारा परिसर, मुंबई-आग्रा रोड
धुळे - गुरुव्दारा आवारातून देशी बनावटीच्या रायफलसह पिस्तुल जप्त


धुळे , 15 जानेवारी (हिं.स.) शहरात अवैध बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तुल, ३१५ रायफल व मॅगझिन असा एकूण ५ लाखांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा (३६) रा. गुरुद्वारा परिसर, मुंबई-आग्रा रोड, धुळे यास अटक करण्यात आली आहे. शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये १० जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा याच्या निवासस्थानातून ४५ कॅलिबरचे (एमएसडी गार्डियन १९११फ पिस्तुल आणि ३१५ स्पोर्ट रायफल, मॅगझिन व जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे व पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande