अमेरिकेची 75 देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित
वॉशिंग्टन , 15 जानेवारी (हिं.स.)।डोनाल्ड ट्रम्प प्रशासन 75 देशांच्या नागरिकांसाठी सर्व व्हिसा प्रक्रिया स्थगित करण्याच्या तयारीत आहे. सोमालिया, रशिया, इराण, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्राझील, नायजेरिया आणि थायलंड या देशांचा प्रभावित देशांम
अमेरिकेत 75 देशांच्या नागरिकांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित


वॉशिंग्टन , 15 जानेवारी (हिं.स.)।डोनाल्ड ट्रम्प प्रशासन 75 देशांच्या नागरिकांसाठी सर्व व्हिसा प्रक्रिया स्थगित करण्याच्या तयारीत आहे. सोमालिया, रशिया, इराण, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्राझील, नायजेरिया आणि थायलंड या देशांचा प्रभावित देशांमध्ये समावेश आहे.ही स्थगिती 21 जानेवारीपासून लागू होणार असून, परराष्ट्र विभागाकडून व्हिसा प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत ती अनिश्चित काळासाठी प्रभावी राहील.

अहवालानुसार, पुनर्मूल्यांकन सुरू असताना विद्यमान कायद्यांच्या आधारे व्हिसा अर्ज नाकारण्याचे निर्देश अमेरिकेतील दूतावासांना देण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जानेवारीत पदभार स्वीकारल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात राबवण्यात येत असलेल्या व्यापक मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या नोव्हेंबरमध्ये व्हाइट हाऊसजवळ एका अफगाण नागरिकाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, तिसऱ्या जगातील देशांतील नागरिकांचा प्रवेश कायमस्वरूपी थांबवण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते. वृत्तानुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा हा निर्णय अशा स्थलांतरितांविरोधातील कारवाईचा भाग आहे, ज्यांच्याकडून सरकारी सहाय्यावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

सरकारी सहाय्यावर अवलंबून राहणे हा अमेरिकेतील स्थलांतर प्रक्रियेतील एक निकष आहे. याचा वापर एखादा परदेशी नागरिक मुख्यत्वे सरकारी मदतीवर अवलंबून राहील की नाही, हे ठरवण्यासाठी केला जातो, ज्याचा ग्रीन कार्डच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये प्रामुख्याने रोख सहाय्य आणि दीर्घकालीन सरकारी अर्थसहाय्यित देखभालीवर लक्ष केंद्रित केले जाते.

माहितीनुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये परराष्ट्र विभागाने जगभरातील दूतावासांना पाठवलेल्या एका संदेशात कांसुलर अधिकाऱ्यांना स्थलांतर कायद्यांतर्गत विस्तारित स्क्रीनिंग नियम लागू करण्याचे निर्देश दिले होते.ज्या अर्जदारांकडून सरकारी लाभांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे, त्यांना व्हिसा नाकारण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते. यासाठी आरोग्य, वय, इंग्रजी भाषेतील प्रावीण्य, आर्थिक स्थिती आणि दीर्घकालीन वैद्यकीय देखभालीची संभाव्य गरज अशा अनेक घटकांचा विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande