अमेरिका लवकरच व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करेल- पाक परराष्ट्र मंत्रालय
इस्लामाबाद, 15 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेने मोठा निर्णय घेत 75 देशांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित केली आहे. या यादीत पाकिस्तानचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुरुवारी आशा व्यक्त केली असून, अमेरिका लवकरच व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करेल
अमेरिका लवकरच व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करेल- पाक परराष्ट्र मंत्रालय


इस्लामाबाद, 15 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेने मोठा निर्णय घेत 75 देशांसाठी व्हिसा प्रक्रिया स्थगित केली आहे. या यादीत पाकिस्तानचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने गुरुवारी आशा व्यक्त केली असून, अमेरिका लवकरच व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरू करेल, असे म्हटले आहे. पाकिस्तान हा निर्णय अमेरिकेच्या अंतर्गत पुनरावलोकन प्रक्रियेचा भाग असल्याचे मानत आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी अमेरिकेकडून लवकरच व्हिसा प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. ही नवी घडामोड असून, आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून आहोत.”

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (स्टेट डिपार्टमेंट) 75 देशांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा प्रक्रिया थांबवल्या आहेत. या यादीत रशिया, पाकिस्तान आणि इराणसह अनेक देशांचा समावेश आहे. सार्वजनिक लाभांवर भार ठरू शकणाऱ्या अर्जदारांना रोखणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या निर्णयामुळे दरवर्षी अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या हजारो पाकिस्तानी नागरिकांच्या प्रवास, शिक्षण आणि रोजगाराच्या योजनांना विलंब होण्याची शक्यता आहे.

ही बंदी 21 जानेवारीपासून लागू होणार असून, परराष्ट्र विभागाकडून व्हिसा प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत ती अनिश्चित काळासाठी सुरू राहील. उल्लेखनीय बाब म्हणजे, मिनेसोटामधील एका घटनेनंतर सोमालिया संघीय अधिकाऱ्यांच्या कठोर निरीक्षणाखाली आला आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर घोटाळा उघडकीस आला असून, त्यात सहभागी असलेले अनेक जण सोमाली नागरिक किंवा सोमाली-अमेरिकन आहेत.

नोव्हेंबर 2025 मध्ये परराष्ट्र विभागाने जगभरातील दूतावासांना पाठवलेल्या एका संदेशात कांसुलर अधिकाऱ्यांना स्थलांतर कायद्यातील तथाकथित ‘सार्वजनिक भार’ तरतुदींअंतर्गत विस्तारित आणि कडक स्क्रीनिंग नियम लागू करण्याचे निर्देश दिले होते. या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या अर्जदारांकडून सार्वजनिक लाभांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे, त्यांना व्हिसा नाकारण्याचे निर्देश कांसुलर अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. यासाठी अर्जदारांचे आरोग्य, वय, इंग्रजी भाषेतील प्रावीण्य, आर्थिक स्थिती तसेच दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची संभाव्य गरज अशा विविध घटकांचा विचार केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande