
बीड, 16 जानेवारी (हिं.स.)।केज पोलिसांनी कानडी रस्त्यावरील एका धाब्याच्या आडोशाला तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांना छापा मारून रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील एक लाख ८८ हजार रुपयांच्या चार दुचाकी, ८३ हजाराचे आठ मोबाईल, नगदी ३२ हजार ५६० रुपये असा तीन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
केजहून कानडी रस्त्यावर असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या धाब्याच्या आडोशाला काही लोक तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याच्या गुप्त
माहितीवरून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, फौजदार उमेश निकम, फौजदार अमिरोद्दीन इनामदार, जमादार महावीर सोनवणे यांच्या पथकाने छापा मारला. आठ जणांना तिर्रट नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, एक लाख ८८ हजार रुपयांच्या चार दुचाकी, ८३ हजाराचे आठ मोबाईल, नगदी ३२ हजार ५६० रुपये असा तीन लाख तीन हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis