गोदरेज प्रॉपर्टीज सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध निवासी रिअल इस्टेट कंपनी
मुंबई, 16 जानेवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासक कंपन्यांपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (स्क्रिप आयडी: GODREJPROP) कंपनीने नोंदणी मूल्य आणि रोख वसुली या प्रमुख कार्यकारी निकषांच्या आधारे कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये सलग दुस
Godrej Properties


मुंबई, 16 जानेवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासक कंपन्यांपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (स्क्रिप आयडी: GODREJPROP) कंपनीने नोंदणी मूल्य आणि रोख वसुली या प्रमुख कार्यकारी निकषांच्या आधारे कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध निवासी रिअल इस्टेट विकासक कंपनी म्हणून स्थान मिळवले असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले.

वर्ष 2025 दरम्यान, जीपीएलने संपूर्ण भारतभरातील 41 यशस्वी प्रकल्प सादरीकरणातून एकूण 27.26 दशलक्ष चौ. फूट विक्रीयोग्य क्षेत्रफळ असलेल्या 16,428 घरांची विक्री केली. नोंदणी मूल्य वार्षिक 19% ने वाढून 34,171 कोटी रु. झाले. यातून वर्ष 2022 ते वर्ष 2025 दरम्यान सुमारे 44% CAGR दिसून आला. वर्षातील वसुली 28% ने वाढून 18,979 कोटी रु. झाली आणि त्यामुळे तीन वर्षांचा CAGR 35% झाला.

जीपीएलने संपूर्ण वर्षभर सातत्यपूर्ण तिमाही कामगिरी केली असून वर्ष 2025 च्या चारही तिमाहींमध्ये 7,000 कोटी रु. पेक्षा जास्त बुकिंग मूल्य नोंदवले. कंपनीची विक्री भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या भागांमध्ये झाली. त्यामध्ये प्रमुख निवासी बाजारपेठांचे योगदान महत्त्वाचे ठरले: MMR (9,677 कोटी रु.), NCR (9,348 कोटी रु.), बंगळुरू (6,566 कोटी रु.), पुणे (4,083 कोटी रु.) आणि हैदराबाद (3,052 कोटी रु.). ही कामगिरी व्यापक आणि वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमुळे शक्य झाली. त्यामध्ये वर्षभरात 11 स्वतंत्र प्रकल्पांनी प्रत्येकी 1,000 कोटी रु. पेक्षा अधिक बुकिंग मूल्य निर्माण केले.

चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (आतापर्यंतचे आर्थिक वर्ष 26), GPL ने 24,008 कोटी रु. चे बुकिंग मूल्य नोंदवले असून यात वार्षिक 25% वाढ झाली आहे. तसेच 12,018 कोटी रु. चे कलेक्शन नोंदवले असून यात वार्षिक 19% ने वाढ झाली आहे. अलीकडील तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये GPL ने 8,421 कोटी रु. चे बुकिंग मूल्य नोंदवून वार्षिक 55% वाढ दर्शवली तसेच वार्षिक 40% वाढ नोंदवून 4,282 कोटी रु. ची वसुली झाली. प्रदेश आणि प्रकल्पांमधील ही मजबूत कामगिरी GPL ची गुणवत्ता, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांवर विशेष लक्ष ठेवत आपले कार्य विस्तारण्याची क्षमता दर्शवते.

कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडेय म्हणाले: “आमच्या ग्राहकांनी दाखवलेल्या सातत्यपूर्ण विश्वासाबद्दल आणि आमच्या टीम्सनी घेतलेल्या अथक प्रयत्नांबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. 2024 हे जास्तीचे आधारभूत वर्ष असूनही 2025 मध्ये अशी वाढ साध्य होणे यातून भारतातील प्रमुख महानगरी बाजारपेठांमध्ये चांगल्या रचनेची, उच्च दर्जाची घरे यासाठी असलेली मजबूत मागणी अधोरेखित होते. उत्कृष्ट डिझाइन, बांधकाम गुणवत्ता, वेळेवर वितरण, शाश्वतता आणि नाविन्यपूर्णता यांच्या माध्यमातून 2026 मध्येही ही गती कायम ठेवण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande