इंस्टाग्राममध्ये भारतीय भाषांमध्ये रील्स अनुवाद व लिप-सिंकची सुविधा
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ या कार्यक्रमात इंस्टाग्रामने भारतीय क्रिएटर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. आता त्यांच्या भाषेच्या आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. कंपनीने Meta AI-आधार
Instagram


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.)। ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ या कार्यक्रमात इंस्टाग्रामने भारतीय क्रिएटर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. आता त्यांच्या भाषेच्या आणि प्रदेशाच्या मर्यादा ओलांडून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. कंपनीने Meta AI-आधारित अनुवाद साधनांचा विस्तार केला असून, नव्या भारतीय भाषांसाठी आकर्षक फॉन्ट्सही उपलब्ध करून दिले आहेत. हे अपडेट्स 16 जानेवारी 2026 पासून हळूहळू रोलआउट होत आहेत. यामुळे क्रिएटर्स त्यांचा स्थानिक आवाज आणि व्यक्तिमत्त्व जपत जागतिक स्तरावर आपली उपस्थिती मजबूत करू शकतील.

इंस्टाग्रामच्या या सर्वात मोठ्या अपडेटमध्ये रील्ससाठी वॉइस अनुवाद आणि डबिंगची सुविधा देण्यात आली आहे. आता क्रिएटर्स Meta AI चा वापर करून त्यांच्या रील्स बंगाली, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मराठी या पाच नव्या भारतीय भाषांमध्ये अनुवादित करू शकतात. यापूर्वी ही सुविधा हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांसाठी उपलब्ध होती. नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेली ही सुविधा आता सर्व वापरकर्त्यांसाठी खुली करण्यात आली आहे.

रील अपलोड किंवा एडिट करताना क्रिएटर Meta AI अनुवाद ऑन करू शकतो. हे साधन मूळ ऑडिओ आपोआप दुसऱ्या भाषेत अनुवादित करते आणि विशेष म्हणजे, रोबोटिक आवाज वापरण्याऐवजी क्रिएटरचा मूळ आवाज, टोन आणि स्टाइल जशाच्या तशा ठेवते. त्यामुळे रील पाहताना ती त्याच व्यक्तीने नव्या भाषेत बोलल्यासारखी नैसर्गिक वाटते. या सुविधेसोबतच ऑप्शनल लिप-सिंक फिचरही देण्यात आलं आहे. हे ऑन केल्यास AI अनुवादित ऑडिओ क्रिएटरच्या तोंडाच्या हालचालींशी अचूक जुळवला जातो. त्यामुळे प्रेक्षकांना अनुभव अधिक प्रमाणिक वाटतो आणि क्रिएटरशी कनेक्शन अधिक घट्ट होतं.

अनुवादासोबतच इंस्टाग्रामने आपल्या ‘एडिट्स’ या व्हिडिओ एडिटिंग टूलमध्ये नवीन भारतीय फॉन्ट्सही जोडले आहेत. आता देवनागरी आणि बंगाली-असमिया स्क्रिप्ट्समध्ये मजकूर आणि कॅप्शन्स जोडता येणार आहेत. याचा फायदा विशेषतः हिंदी, मराठी, बंगाली आणि आसामी भाषांतील क्रिएटर्सना होणार असून, व्हिडिओ अधिक स्थानिक आणि आकर्षक दिसतील.

हे फॉन्ट्स वापरण्यासाठी एडिटिंग टाइमलाइनमध्ये “Text” वर टॅप करून “Aa” आयकॉन निवडावा लागेल. त्यानंतर उपलब्ध फॉन्ट्स ब्राउज करता येतील. जर डिव्हाइस आधीच भारतीय स्क्रिप्टवर सेट असेल, तर हे फॉन्ट्स डिफॉल्ट दिसतील, अन्यथा भाषेनुसार फिल्टर करून निवडता येतील. हे अपडेट्स लवकरच अँड्रॉइड डिव्हाइसेसवरही उपलब्ध होणार आहेत.

हे सर्व अपडेट्स इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या क्रिएटर-केंद्रित फीचर्सचा भाग आहेत. यामध्ये AI-आधारित फोटो आणि व्हिडिओ रिस्टायलिंग, बल्क कॅप्शन एडिट्स, व्हिडिओ रिव्हर्सल, लिप-सिंक इफेक्ट्स आणि शेकडो नवीन साउंड इफेक्ट्स यांचा समावेश आहे. भारतातील क्रिएटर्सना जागतिक मंचावर पोहोचवताना त्यांचा स्थानिक आवाज आणि ओळख जपण्यावर मेटाने विशेष भर दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande