बजेटच्या दिवशी १ फेब्रुवारीला खुले राहणार शेअर बाजार
नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.)। यंदा १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार असून, त्या दिवशी रविवार असला तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हे दोन्ही शेअर बाजार व्यवहारासाठी खुले राहणार आहेत. बीएसई आणि एनएसई यांनी गुंतव
NSE BSE


नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.)। यंदा १ फेब्रुवारी रोजी बजेट सादर होणार असून, त्या दिवशी रविवार असला तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हे दोन्ही शेअर बाजार व्यवहारासाठी खुले राहणार आहेत. बीएसई आणि एनएसई यांनी गुंतवणूकदारांना दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी नेहमीच्या वेळेनुसारच व्यवहार होतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना बजेटमधील घोषणांवर तत्काळ प्रतिक्रिया देण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्या दिवशी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकात सांगितले आहे की केंद्रीय बजेट सादर होत असल्यामुळे १ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे ‘लाइव्ह’ ट्रेडिंग सत्र आयोजित केले जाईल. परिपत्रकानुसार ‘प्री-ओपन मार्केट’ सकाळी ९ वाजता सुरू होऊन ९.०८ वाजता संपेल आणि सामान्य व्यवहार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत चालतील.

त्याचप्रमाणे बीएसईनेही १ फेब्रुवारी रोजी व्यवहार होणार असल्यासंबंधी गुंतवणूकदारांसाठी परिपत्रक जारी केले आहे. बीएसईच्या नोटिसनुसार १ फेब्रुवारी हा ‘विशेष व्यवहार दिवस’ घोषित करण्यात आला असून बाजार नेहमीच्या व्यवहार वेळेत खुले राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande