छ. संभाजीनगर : मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा
छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान गरवारे केंद्र परिसरात अवैध व बेकायदेशीर जमाव जमविल्या प्रकरणात १०० ते १५० महिला-पुरुषांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
छ. संभाजीनगर : मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा


छत्रपती संभाजीनगर, 18 जानेवारी (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान गरवारे केंद्र परिसरात अवैध व बेकायदेशीर जमाव जमविल्या प्रकरणात १०० ते १५० महिला-पुरुषांविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गरवारे हायटेक स्ट्राँग रूम हॉलबाहेर हा प्रकार घडला.

एमआयडीसी सिडको ठाण्याचे हवालदार विजय छगनराव पोळ (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोळ हे गरवारे हायटेक स्ट्रॉगरुम हॉलच्या बाहेर असलेल्या मतमोजणी केंद्रावर कर्तव्यावर हजर होते. यावेळी मतमोजणी सुरू असताना अचानक

१०० ते १५० महिला व पुरुषांनी बेकायदा जमाव जमवून मतमोजणीच्या आवारातच थांबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावाला आचारसंहिता लागू असून तत्काळ परिसर सोडण्याच्या सूचना दिल्या. सूचना देऊनही जमावाने घटनास्थळीच थांबून आदेशांचे उल्लंघन केले, अशी माहिती तक्रारीत देण्यात आले आहे.

या प्रकरणात संबंधीत जमावाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार विष्णु मुंढे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande