रत्नागिरी पोलिसांकडून एआय आधारित अ‍ॅपच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध
रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी पोलीस दलाने एआय आधारित रेड्स (Ratnagiri Advanced Integrated Data System) अ‍ॅपच्या प्रभावी वापरातून हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकार
रत्नागिरी पोलीस एआय अॅप


रत्नागिरी, 18 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी पोलीस दलाने एआय आधारित रेड्स (Ratnagiri Advanced Integrated Data System) अ‍ॅपच्या प्रभावी वापरातून हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेतला आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टी व संकल्पनेतून साकारलेल्या रेड्स अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने या प्रकरणातील तपासाला मोठी चालना मिळाली. गेल्या 12 जानेवारी रोजी संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर तत्काळ त्या मुलीचे छायाचित्र रेड्स अ‍ॅपमधील Missing Persons विभागात अपलोड करण्यात आले. Dev-Drushti AI प्रणालीच्या सहाय्याने तिच्या १०८ वेगवेगळ्या स्वरूपातील एआय जनरेटेड प्रतिमा तयार करून शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली.या तांत्रिक मदतीच्या आधारे हरवलेली मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने तत्काळ कारवाई करत मुलीचा सुखरूप शोध घेण्यात यश मिळविले.

या मुलीस सुरक्षितपणे रत्नागिरीत आणून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.एआय आधारित रेड्स अ‍ॅपच्या प्रभावी वापरामुळे हरवलेल्या व्यक्तींचा शोध जलद व अचूकपणे घेणे शक्य झाले असून, रत्नागिरी पोलीस दलाच्या तंत्रज्ञानाधारित व नागरिक-केंद्रित पोलिसिंगचा हा आणखी एक यशस्वी दाखला ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande