रसायनी येथे छत तोडून ३१ हजारांचा ऐवज लंपास
रायगड, 18 जानेवारी (हिं.स.)। रसायनी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, चावंढोली गावातील एका किराणा सुपरमार्केटमध्ये मध्यरात्री छत फोडून करण्यात आलेल्या धाडसी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आह
theft


रायगड, 18 जानेवारी (हिं.स.)। रसायनी परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून, चावंढोली गावातील एका किराणा सुपरमार्केटमध्ये मध्यरात्री छत फोडून करण्यात आलेल्या धाडसी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चावंढोली येथे असलेल्या श्रीराम किराणा माल सुपर मार्केटमध्ये दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने दुकानाच्या छतावरील सिमेंटचा पत्रा तोडून त्यामार्गे दुकानात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या संमतीशिवाय व लबाडीच्या हेतूने दुकानातील ३१ हजार ७०० रुपये रोख रक्कम व इतर किरकोळ मुद्देमाल चोरी करून चोरटा पसार झाला.

सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता छत फोडलेले व दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे चावंढोलीसह परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी दुकाने सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार सुशांत पिंगळे अधिक तपास करीत आहेत.

परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी रात्रीची पोलीस गस्त वाढवण्यासह सीसीटीव्ही देखरेख मजबूत करण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande