जळगाव: बेकायदेशीर वास्तव्य प्रकरणी इराणी महिलेसह तिघांना अटक
जळगाव, 19 जानेवारी (हिं.स.) : जळगावच्या धरणगाव परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या एका इराणी महिलेच्या अटकेनंतर हे प्रकरण गंभीर वळणावर पोहचले आहे. सुरुवातीला फक्त अवैध मुक्कामाचे प्रकरण वाटले तरी, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अटकेत असलेल्या इराणी महिलेचे धागेदोरे थेट पाकिस्तानपर्यंत जोडले असल्याचे उघड झाल्यामुळे हे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात महत्वाचे बनले आहे. धरणगाव पोलिसांनी इराणी महिलेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलाला बेकायदेशीर आश्रय दिल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, महिलेला आश्रय देणाऱ्या तसेच मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी संशयितांचे मोबाईल जप्त करून तपासणी केली असता, आंतरराष्ट्रीय नंबर आढळून आले. तपासात असे समोर आले की, आरोपींनी पाकिस्तानातील एका व्यक्तीशी व्हॉट्सॲप आणि व्हिडिओ कॉल केले होते. हा नंबर मोबाईलमध्ये ‘सलमान भाई’ म्हणून सेव्ह होता. ‘सलमान’ कोण आहे आणि त्याचा हेतू काय होता, यावर आता सुरक्षा यंत्रणांची नजर केंद्रित झाली आहे.

तपासात तेलंगाणा कनेक्शन देखील समोर आला आहे. आतापर्यंत तिघांना अटक झाली असून, त्यातील एक आरोपी तेलंगणातील असून त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारावर इराणी महिलेला सिम कार्ड दिले होते.

धरणगाव न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तिघांचा जामीन फेटाळून लावला आहे. पोलीस ‘सलमान’ नावाच्या व्यक्तीचा चेहरा व खरा हेतू शोधण्यासाठी तांत्रिक तपास वेगाने चालवत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

 rajesh pande