
अकोला, 19 जानेवारी (हिं.स.)।
येथील निवडणुकीमध्ये शरद श्रीराम तुरकर व नितीन नरेश राऊत है एकाच पक्षाच्या पॅनलवर उभे होते. मतमोजणीच्या दिवशी भाजपचे पराभूत उमेदवार राऊत यांनी भाजप नगरसेवक तुरकर यांच्यावर हल्ला केला होता.. त्यामधील मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शरद तुरकर यांचा महानगरपालिका अकोला येथील निवडणुकीमध्य विजयी झाले तर त्यांचे पॅनेल मधील नितीन नरेश राउत यांचा पराभव झाला. या पराभवाचा आरोपी नितीन राउत याने मनात राग ठेवून आरोपी नितीन राउत याने शरद तुरकर यांना आरोपीचे कार्यालयाजवळ बोलावुन गैरकायदयाची मंडळी जमवुन आरोपी नितीन राऊत याने शरद तुरकर यांना जीवाने मारण्याचे उद्देशाने लाठीसह दगडाने डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले तसेच नितीन राऊत यांचे सह असलेल्या इतर आरोपीनी शरद तुरकर यांचे डोक्यात लोखंडी तराजु मारून जखमी केले. शरख तुरकर यांचे भाउ भरत श्रीराम तुरकर हे भांडण आवरत असतांना आरोपीनी त्यांना ही शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली व जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारी वरून पोलीस स्टेशन अकोट फाईल अकोला येथे गुन्हा कमांक ४९/२६ कलम १०९,१८९ (२),१९१(२),१९१(३),१९०, ११५(२), ३५२, ३५१ (२) बीएनएस सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे