
नवी दिल्ली , 06 जानेवारी (हिं.स.)।करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने अभिनेता थलापती विजय यांना नोटीस पाठवली असून १२ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. थलापती विजय यांना १२ जानेवारी रोजी दिल्लीत असलेल्या सीबीआय मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे.
27 सप्टेंबर 2025 रोजी तमिळनाडूच्या करूर येथे विजय यांच्या पक्ष तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) ची एक जाहीर सभा झाली होती. या सभेदरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली होती. माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत किमान 41 जणांचा मृत्यू झाला असून 110 हून अधिक लोक जखमी झाले होते.
करूर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरच्या दुसऱ्याच दिवशी विजय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली होती. याआधी अनेकांनी विजय यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि करूर चेंगराचेंगरीसाठी त्यांनाच जबाबदार धरले होते. आता या प्रकरणात सीबीआयकडून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode