दिल्लीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.) दिल्लीच्या आदर्श नगर येथील मेट्रो स्टाफ क्वार्टरमध्ये भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत एका कुटुंबातील 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पती अजय, पत्नी नीलम आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी जान्हवी यांचा समावेश आ
दिल्लीच्या  मेट्रो स्टाफ क्वार्टरमधील आग विझवताना अग्निशमन कर्मचारी


नवी दिल्ली, 06 जानेवारी (हिं.स.) दिल्लीच्या आदर्श नगर येथील मेट्रो स्टाफ क्वार्टरमध्ये भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत एका कुटुंबातील 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पती अजय, पत्नी नीलम आणि त्यांची 10 वर्षांची मुलगी जान्हवी यांचा समावेश आहे. अग्निशमन विभागाला रात्री 2.39 वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर 6 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या कारणाचा छडा लावला जातोय.

अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, बाह्य दिल्लीतील आदर्श नगर परिसरात असलेल्या दिल्ली मेट्रो स्टाफ क्वार्टरमध्ये ही आग लागली. एका खोलीत झोपलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या निष्पाप मुलीचा या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री 2.39 वाजता डीएमआरसी क्वार्टरमधील घरगुती सामानाला आग लागल्याची माहिती मिळाली होती. आग विझवण्यासाठी 6 गाड्या तात्काळ पाठवण्यात आल्या. , आग पाचव्या मजल्यावर लागली होती. अग्निशमन दलाने आत प्रवेश केला असता 3 जणांचे जळालेले मृतदेह आढळून आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 6.40 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले. आग एका खोलीतील घरगुती सामानाला लागली होती, ज्यामुळे त्या खोलीत तीन जळालेले मृतदेह आढळले. आग विझवताना अग्निशमन कर्मचारी राकेश यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांना जगजीवन रुग्णालयात नेण्यात आले होते, प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande