सिंपल वन जेन-2 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च
मुंबई, 6 जानेवारी, (हिं.स.)। इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माता कंपनी सिंपल एनर्जीने विक्रीचा वेग काहीसा मंद असतानाही आपल्या लोकप्रिय सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचा अपडेटेड 2026 मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने या नव्या मॉडेलला ‘जेन 2’ म्हणू
Simple One Gen 2 Scooter


मुंबई, 6 जानेवारी, (हिं.स.)। इलेक्ट्रिक दुचाकी वाहन निर्माता कंपनी सिंपल एनर्जीने विक्रीचा वेग काहीसा मंद असतानाही आपल्या लोकप्रिय सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरचा अपडेटेड 2026 मॉडेल भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने या नव्या मॉडेलला ‘जेन 2’ म्हणून सादर केले असले, तरी प्रत्यक्षात हे मॉडेल अनेक बाबतीत आधीच्या जेन 1.5 स्कूटरवर आधारित आहे. मात्र, काही महत्त्वाच्या बदलांमुळे ही स्कूटर आता अधिक चांगली व्हॅल्यू फॉर मनी देतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

सिंपल वन स्कूटर प्रथम 2021 मध्ये सादर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत तो 2023 मध्येच पोहोचू शकला. आता 2026 मॉडेलमध्ये कंपनीने वजन कमी केले असून, डिझाइनमध्ये सूक्ष्म बदल, टॉप स्पीडमध्ये वाढ आणि रेंजमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, सिंपल वन जेन २ इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची प्रास्ताविक किंमत १,३९,९९९ रुपये (ई-शोरूम) आहे. तर सिंपल वन S 3.7 kWh व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 1.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, तर टॉप-स्पेक 5 kWh व्हेरिएंटची किंमत 1.78 लाख रुपये आहे. सध्या मर्यादित कालावधीसाठी 10 हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे.

नव्या 2026 सिंपल वनमध्ये अंतर्गत रचनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आधीच्या मॉडेल्समध्ये सीटखाली देण्यात येणारी रिमूवेबल 1.6 kWh बॅटरी आता काढून टाकण्यात आली असून, तिच्या जागी अधिक मजबूत शेलसह फिक्स्ड 5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे सीटखालील स्टोरेज स्पेस वाढून आता 35 लिटर झाली आहे. यासोबतच स्कूटरचा फ्रेम अधिक मजबूत करण्यात आला असून, यामुळे राइडिंग स्टॅबिलिटी आणि ऑन-रोड परफॉर्मन्स सुधारल्याचा दावा कंपनीने केला आहे.

डिझाइनच्या बाबतीत सिम्पल वनमध्ये मोठे बदल नाहीत, मात्र सीटची उंची कमी करून 780 मिमी करण्यात आली आहे. तसेच स्कूटरचे वजन सुमारे 8 किलोने कमी करण्यात आले असून, 5 kWh व्हेरिएंटचे एकूण वजन आता 129 किलो इतके आहे. यामध्ये नव्याने डिझाइन केलेला डॅशबोर्ड देण्यात आला असून, आधीप्रमाणेच 7.0 इंचाचा TFT टचस्क्रीन आणि सुधारित स्विचगिअर मिळतो.

पॉवरट्रेनच्या बाबतीत, 2026 सिम्पल वनमध्ये परमनंट मॅग्नेट मोटर देण्यात आली असून ती आता 11.8 bhp इतकी पीक पॉवर निर्माण करते. पीक टॉर्क मात्र 72 Nm इतकाच ठेवण्यात आला आहे. स्कूटर 0 ते 40 किमी प्रतितास वेग अवघ्या 2.55 सेकंदांत गाठतो. नव्या SonicX राइड मोडमध्ये 5 kWh व्हेरिएंट तब्बल 115 किमी प्रतितास टॉप स्पीड गाठू शकतो, जो आधीच्या मॉडेलपेक्षा 10 किमी प्रतितास अधिक आहे.

बॅटरी पर्यायांच्या बाबतीत, सिंपल एनर्जीने हा स्कूटर तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे. सिम्पल वन S 3.7 kWh व्हेरिएंटला 190 किमीची IDC रेंज आणि 90 किमी प्रतितास टॉप स्पीड मिळतो. मिड व्हेरिएंट 4.5 kWh मध्ये 236 किमी IDC रेंज असून टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. तर टॉप व्हेरिएंट 5 kWh मध्ये 265 किमीची IDC रेंज आणि 115 किमी प्रतितास टॉप स्पीड देण्यात आला आहे.

सर्व व्हेरिएंट्ससोबत 750 वॉटचा पोर्टेबल चार्जर देण्यात येतो. 3.7 kWh बॅटरी 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात, 4.5 kWh बॅटरीसाठी 4 तास 45 मिनिटे, तर 5 kWh बॅटरीसाठी सुमारे 5 तास 20 मिनिटांचा वेळ लागतो. सुधारित रेंज, वाढलेली टॉप स्पीड आणि कमी वजनामुळे 2026 सिम्पल वन इलेक्ट्रिक स्कूटर पुन्हा एकदा ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande