महिंद्रातर्फे XUV 3XO श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सादर; 13.89 लाख रु. पासून सुरुवात
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडतर्फे आज XUV 3XO EV चे अनावरण करण्यात आले असून त्याची प्रारंभिक किंमत 13.89 लाख रु. आहे. चोखंदळ ग्राहकांच्या आकांक्षा आणि बदलत्या विशेष गरजा लक्षात घ
महिंद्रातर्फे XUV 3XO श्रेणीमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन सादर; 13.89 लाख रु. पासून सुरुवात


मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.)। भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडतर्फे आज XUV 3XO EV चे अनावरण करण्यात आले असून त्याची प्रारंभिक किंमत 13.89 लाख रु. आहे. चोखंदळ ग्राहकांच्या आकांक्षा आणि बदलत्या विशेष गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेल्या या XUV 3XO EV मध्ये शहरी डिझाइन, कार्यक्षमता, सुरक्षितता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा परिपूर्ण समतोल साधण्यात आला आहे.

या वाहनाचा समकालीन आणि ठसठशीत लूक रस्त्यावर आत्मविश्वास निर्माण करतो आणि ही ईव्ही XUV 3XO कुटुंबाचा भाग असल्याची त्वरित ओळख पटते. अंतर्गत भागात आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि प्रीमियम वातावरण यांचा संगम असून, प्रत्येक प्रवासात आराम देण्यासाठी ते डिझाइन करण्यात आले आहे. आकर्षक डिझाइनसोबतच, XUV 3XO EV व्यावहारिक मालकीचा अनुभव देत असून ग्राहकांसाठी किफायतशीर पर्याय ठरणार आहे.

एप्रिल 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या XUV 3XO ने या विभागामधील आघाडीची अनेक वैशिष्ट्ये सादर करत सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. सादर झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 1.8 लाख विक्रीचा टप्पा गाठत या मॉडेलला प्रचंड यश मिळाले आहे. XUV 3XO EV पण याच भक्कम पायावर आधारित असून शहरांतर्गत प्रवासासाठी वाहनाचा वापर करणाऱ्या आणि पुढच्या काळाचे स्मार्ट पाऊल म्हणून इलेक्ट्रिक एसयूव्ही हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आली आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “XUV 3XO ने आकांक्षा आणि सुलभता यांना एकत्र आणत नियमच बदलून टाकले. दिवसेंदिवस आपल्या दैनंदिन जीवनात स्वाभाविकपणे ईव्ही गाडी असावी अशी अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी XUV 3XO EV च्या माध्यमातून आम्ही हीच यशस्वी संकल्पना इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये विस्तारत आहोत. दळणवळणाच्या रोजच्या गरजा विश्वासार्हपणे पूर्ण करेल हे सुनिश्चित करत XUV 3XO EV ची अभियांत्रिकी प्रत्यक्ष वापर पद्धती लक्षात घेऊन करण्यात आली आहे. तत्काळ इलेक्ट्रिक परफॉर्मन्ससोबतच शहरातील ड्रायव्हिंगसाठी आत्मविश्वास आणि सहजता देणारे पॅकेज यामध्ये एकत्र आले आहे.”

प्रमुख वैशिष्ट्ये:

जागा आणि आराम – प्रशस्त डिझाइन, प्रत्येक प्रवासात उत्कृष्ट आराम. ड्युअल झोन एसी, ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, पॅनोरॅमिक सनरूफ, पॅसिव्ह कीलेस एंट्री (PKE), 6-वे अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 60:40 रिअर सीट्स.

थ्रिल आणि मनोरंजन – सेगमेंटमधील सर्वात जलद – फक्त 8.3 सेकंदात 0-100 km/h, 310 Nm टॉर्क आणि 110 kW पॉवर. फन, फास्ट, फिअरलेस असे मल्टी ड्राइव्ह मोड्स. ट्विन HD इन्फोटेनमेंट आणि पूर्णपणे डिजिटल क्लस्टर, डॉल्बी अ‍ॅटमॉससह 7-स्पीकर हार्मन कार्डन ऑडिओ.

तंत्रज्ञान आणि सुरक्षितता –80 हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह अ‍ॅड्रेनॉक्स, रिमोट व्हेईकल कंट्रोल, व्हेईकल स्टेटस मॉनिटरिंग, ट्रिप समरी, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि इन-कार अ‍ॅप्स सपोर्ट. लेव्हल 2 ADAS – अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, स्मार्ट पायलट असिस्ट, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग इत्यादी. 360-डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टीम, 6 एअरबॅग्स, 4 डिस्क ब्रेक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीमसह 35 स्टँडर्ड सेफ्टी वैशिष्ट्ये.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande