सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
नवी दिल्ली , 06 जानेवारी (हिं.स.)।काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना सोमवारी दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना छातीविकार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ही
सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर


नवी दिल्ली , 06 जानेवारी (हिं.स.)।काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना सोमवारी दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना छातीविकार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ही नियमित स्वरूपाची रुग्णालयात दाखल होण्याची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयातील एका सूत्राने सांगितले की, सोनिया गांधी यांना दीर्घकाळापासून खोकल्याचा त्रास आहे आणि शहरातील प्रदूषण लक्षात घेता त्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात येत असतात.

रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची तब्येत सध्या ठीक आहे. विशेषतः छातीशी संबंधित समस्यांसाठी त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांना आधीपासूनच जुन्या खोकल्याची तक्रार असून, त्यामुळे त्या ठरावीक कालावधीनंतर रुग्णालयात येऊन तपासणी करून घेत असतात. डिसेंबर 2025 मध्ये सोनिया गांधी 79 वर्षांच्या झाल्या आहेत.

सर गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी रात्री सुमारे 10 वाजता सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि वैद्यकीय तपासणीत थंडी आणि प्रदूषणाच्या एकत्रित परिणामामुळे त्यांचा ब्रॉन्कियल दमा (अस्थमा) थोडा वाढल्याचे आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचार आणि देखरेखीकरिता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. उपचारांचा त्यांच्यावर चांगला परिणाम होत असून, अँटिबायोटिक्स आणि इतर सहाय्यक औषधांच्या मदतीने त्यांचे उपचार सुरू आहेत. त्यांना रुग्णालयातून केव्हा डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय उपचार करणारे डॉक्टर त्यांच्या क्लिनिकल प्रगतीच्या आधारे घेतील आणि हे एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande