
नांदेड, 6 जानेवारी, (हिं.स.)। लवकरच नांदेड - गोवा विमानसेवेचा शुभारंभ होणे अपेक्षित आहे. अशी माहिती नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, नांदेड येथील गुरुगोबिंद सिंघजी विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या दिशेने 'फ्लाय-91' कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी दोन विमाने भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला असून, या माध्यमातून ते नांदेडसह देशातील इतर शहरांमध्ये सेवेचा विस्तार करणार आहेत. 'फ्लाय-91' कंपनीनेच ही माहिती दिली असून ही दोन्ही विमाने उपलब्ध झाल्यानंतर नांदेड - गोवा विमानसेवेचा शुभारंभ होणे अपेक्षित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis