कोलंबो विमानतळावर कोट्यवधी रुपयांच्या गांजासह ३ भारतीयांना अटक
नवी दिल्ली , 07 जानेवारी (हिं.स.)।श्रीलंकेत तीन भारतीय नागरिकांना कथितरित्या ५० किलो गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या गांजाची किंमत सुमारे १४.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत
कोलंबो विमानतळावर कोट्यवधी रुपयांच्या गांजासह ३ भारतीयांना अटक


नवी दिल्ली , 07 जानेवारी (हिं.स.)।श्रीलंकेत तीन भारतीय नागरिकांना कथितरित्या ५० किलो गांजा बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या गांजाची किंमत सुमारे १४.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत जप्त झालेली ही सर्वात मोठी अंमली पदार्थांची खेप आहे.

अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की हे संशयित बँकॉकहून श्रीलंकन एअरलाईन्सच्या विमानाने बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. दोन महिला संशयितांचे वय २५ ते २७ वर्षांदरम्यान असून त्या मुंबईच्या रहिवासी आहेत आणि पेशाने शिक्षिका आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, तिघेही ग्रीन चॅनेलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी त्यांना अटक करण्यात आली. पोलिस नार्कोटिक्स ब्युरोने सांगितले की ते ५० किलो कुश गांजा वाहतूक करत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande