ॲक्सिस बँकेने ‘सेफ्टी सेंटर’ केले सुरू
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या ‘ओपन’ या मोबाइल बँकिंग अ‍ॅपवर ग्राहकांच्या पूर्ण नियंत्रणाखाली काम करणारे ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना संशयास्पद किंवा अनधिकृत हा
Axis Bank


मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेने आपल्या ‘ओपन’ या मोबाइल बँकिंग अ‍ॅपवर ग्राहकांच्या पूर्ण नियंत्रणाखाली काम करणारे ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना संशयास्पद किंवा अनधिकृत हालचालींविरोधात आपल्या खात्यांचे संरक्षण रिअल-टाइममध्ये करता येणार असून यासाठी शाखेत जाण्याची किंवा ग्राहकसेवेशी संपर्क साधण्याची गरज भासणार नाही.

‘सेफ्टी सेंटर’मध्ये इंटरनेट बँकिंग बंद करणे, निधी हस्तांतरण थांबवणे, यूपीआय व्यवहार मर्यादित करणे, नवीन लाभार्थी जोडण्यावर नियंत्रण ठेवणे तसेच व्यवहारांची मर्यादा निश्चित करणे अशा सूक्ष्म सुरक्षा नियंत्रणांचा समावेश आहे. बँकेने सादर केलेले ‘एसएमएस शिल्ड’ हे वैशिष्ट्य विशेष ठरत असून बँकेकडून आलेल्या संदेशातील सेंडर आयडी अधिकृत आयडीशी पडताळून एसएमएसची सत्यता तपासण्यास मदत करते. यामुळे फसवणूक करणाऱ्या बनावट संदेशांचा धोका कमी होण्यास हातभार लागणार आहे.

या सुविधा सक्रिय केल्यानंतर बदल तात्काळ लागू होत असल्याने प्रतीक्षा कालावधी राहत नाही. त्यामुळे ग्राहकांना आपल्या बँकिंग सुरक्षेवर पूर्ण नियंत्रण मिळते. निवडक ब्लॉकिंग आणि रिअल-टाइम नियंत्रणामुळे डिजिटल फसवणुकीचा धोका कमी होऊन व्यवहार अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे शाखा आणि कॉल सेंटरवरील अवलंबित्वही घटण्याची शक्यता आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना अ‍ॅक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह – डिजिटल बिझनेस, ट्रान्सफॉर्मेशन अँड स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स समीर शेट्टी यांनी सांगितले की, बँकेच्या डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनात ग्राहकांची सुरक्षितता हा कणा आहे. ‘सेफ्टी सेंटर’ हे ग्राहकांना त्यांच्या सुरक्षेवर रिअल-टाइम नियंत्रण देणारे महत्त्वाचे पाऊल असून इन-अ‍ॅप मोबाईल ओटीपी आणि एसएमएस शिल्डसारख्या प्रगत प्रमाणीकरण पद्धतींमुळे संरक्षण आणखी मजबूत होत आहे.

‘सेफ बँकिंग’ अभियानांतर्गत अ‍ॅक्सिस बँकेने यापूर्वी ‘लॉक एफडी’सारखी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे डिजिटल माध्यमातून मुदत ठेवी अकाली बंद करण्यास प्रतिबंध होतो. डिजिटल बँकिंगचा वापर वेगाने वाढत असताना सुरक्षित, लवचिक आणि भविष्यकालीन बँकिंग अनुभव देण्यावर अ‍ॅक्सिस बँक भर देत असून या नव्या सुविधेमुळे ग्राहक सुरक्षेला अधिक बळ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande