
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.) - फेडरल बँकने आपल्या ब्रँडची ओळख नव्या आणि आधुनिक रूपात सादर करत ‘द फॉर्च्युना वेव्ह’ या संकल्पनेचे भव्य अनावरण केले. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्याला बँकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच ब्रँड अॅम्बेसेडर विद्या बालन उपस्थित होत्या.
नव्या ब्रँड ओळखीमधून फेडरल बँकेची आजवरची विश्वासार्ह वाटचाल, काळानुरूप बदल स्वीकारण्याची तयारी आणि भविष्यासाठी सज्ज असलेली दृष्टी ठळकपणे दिसून येते. हा बदल म्हणजे दिशाबदल नसून बँकेच्या मूल्यांवर आधारित एक सौम्य, पण सशक्त उत्क्रांती असल्याचे बँकेने स्पष्ट केले.
प्रामाणिकपणा, समृद्धी आणि मैत्रीचे प्रतीक ‘फॉर्च्युना वेव्ह’ हे बोधचिन्ह प्रामाणिकपणा, एकत्रपणा आणि समृद्धी या तीन मूलभूत मूल्यांचे प्रतिनिधित्व करते. ग्राहक, गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांशी दृढ नाते निर्माण करण्याचा बँकेचा दृष्टिकोन या नव्या ओळखीतून व्यक्त होतो. नव्या डिझाइनमुळे बँकेच्या भौतिक व डिजिटल माध्यमांमध्ये सुसंगतता, आकर्षकता आणि आधुनिकता आली आहे.
तरुण पिढीसाठी डिजिटल-सक्षम ब्रँड
नव्या लोगोमध्ये प्रवाही, गोलाकार फॉन्टचा वापर करण्यात आला असून ओळखीची पिवळी अधोरेखित रेषा कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बँकेचा दृश्यात्मक डीएनए जपला गेला असून, डिजिटल प्लॅटफॉर्मवर ब्रँड अधिक प्रभावीपणे सादर होणार आहे. हे “परिचित पण ताजेतवाने” रूप तरुण, डिजिटल-सक्षम ग्राहकांच्या अपेक्षांशी सुसंगत असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
नेतृत्वाचे मत
ब्रँडच्या नव्या ओळखीबद्दल बोलताना व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. एस. मणियन यांनी सांगितले की, ही ओळख फेडरल बँकेच्या मूळ मूल्यांवर ठाम असून भविष्यातील संधींसाठी अधिक गतिमान बनवणारी आहे. तर मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती यांनी सांगितले की, ‘फॉर्च्युना वेव्ह’च्या माध्यमातून ब्रँडचा वारसा जपत भविष्यातील प्रगतीला गती देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.
विद्या बालन यांचे कौतुक
या प्रसंगी विद्या बालन यांनी फेडरल बँकेच्या सातत्यपूर्ण नवकल्पनांचे कौतुक करत, “स्वतःला सतत नव्याने सादर करण्याची तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे. फेडरल बँक हेच तत्त्व प्रत्यक्षात उतरवत असल्याचे पाहून आनंद वाटतो,” असे मत व्यक्त केले.
साइडवेज या ब्रँड सल्लागार संस्थेच्या सहकार्याने साकारलेली ही नवी ओळख फेडरल बँकेला एक विश्वासार्ह, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज राष्ट्रीय वित्तसंस्था म्हणून अधिक बळकटी देणारी ठरणार आहे.
सर्वव्यापी बोधचिन्ह
फॉर्च्युना वेव्ह हे ब्रँडचे बोधचिन्ह आहे आणि त्याला संपर्क आणि संवाद साधण्यासाठी केल्या जात असलेल्या सर्व प्रयत्नांचा एक केंद्रीय घटक म्हणून पुनर्परिभाषित करण्यात आलेले आहे. तसेच आधुनिक रूपही देण्यात आलेले आहे. बोधचिन्हातील तीन लाटा प्रामाणिकपणा, एकत्रपणा आणि समृद्धी यांचे प्रतिनिधित्व करतात आणि हीच मूल्ये फेडरल बँकेच्या प्रगतीच्या प्रवासाला मार्गदर्शन करतात. हे बोधचिन्ह बँकेची सामूहिक वाढ, आशावाद आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून कार्य करते. अखंड डिजिटल अभिव्यक्तीसाठी सोप्या रुपात सादर करण्यात आलेले हे बोधचिन्ह आता ब्रँडचे महत्व स्पष्ट करणारे एक जिवंत माध्यम बनले आहे.
ब्रँडमध्ये आमूलाग्र बदल
नवीन लोगो आणि बोधचिन्ह दृश्यमानता, वाच्यता, शैली, सूर, रंगांचा वापर आणि अनुकूलता या सर्व घटकांचा परिणाम वाढवतात. बँक आपल्या व्यवसायात जोपासत असलेली आपुलकी आणि सुलभता या घटकांवर हा लोगा अधिक भर देतो. वाक्यरुपी शैलीतील मांडणीमुळे व्यावसायिकता आणि मैत्रीपूर्णता यांच्यात संतुलन साधले गेले आहे.
या कार्यक्रमादरम्यान ब्रँड अॅम्बेसेडर विद्या बालन म्हणाल्या, “फेडरल बँक ही एक अशी बँक आहे जी तिच्या पायावर स्थिर आहे, आपल्या वाटचालीबाबत ठाम आहे आणि भविष्यासाठी सक्षम, शाश्वत शाखांचे जाळे तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे. अभिनय क्षेत्रात स्वतःला ताजेतवाने करण्याची आणि नवीन शोध घेण्याची मला सतत गरज असते. अशा प्रयत्नांमुळे तुम्ही तुमच्या शेवटच्या यशाइतकेच टवटवीत असतात. मी ज्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करतो, तो देखील काळानुरूप टवटवीत राहण्यासाठी तितकेच जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे पाहून मला अतिशय आनंद होतो. प्रेक्षकांमध्ये विवेकशक्ती अतिशय तीक्ष्ण असताना बँकेचे प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहेत.”
साईडवेजच्या सहकार्यामुळे ही नवीन ओळख निर्माण झाली आणि त्यामुळे धोरणात्मक स्पष्टता आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांचा मिलाफ झाला आहे. त्यामुळे फेडरल बँकेचा डिजिटल पातळीवरील आत्मविश्वास आणि केंद्रस्थानी मानवी संबंध असलेली राष्ट्रीय स्तरावरील संस्था म्हणून विकसित होत असलेली भूमिका अधिक प्रकट झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी