भारतीय स्वयंपाकघरांची नव्याने व्याख्या करणे गोदरेज 'इंटेरिओ'चा उद्देश
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचा होम आणि ऑफिस फर्निचर ब्रँड असलेल्या ''इंटेरिओ बाय गोदरेज''ने पुढील पाच वर्षांत आपला किचन व्यवसाय 10 टक्के सीएजीआरने वाढवण्याची योजना जाहीर केली आहे. आधुनिक भारतीय घरांमध्ये स्वयंपाकघरांसाठी अ
Godrej Interio


मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। गोदरेज एंटरप्राइझ ग्रुपचा होम आणि ऑफिस फर्निचर ब्रँड असलेल्या 'इंटेरिओ बाय गोदरेज'ने पुढील पाच वर्षांत आपला किचन व्यवसाय 10 टक्के सीएजीआरने वाढवण्याची योजना जाहीर केली आहे. आधुनिक भारतीय घरांमध्ये स्वयंपाकघरांसाठी असलेल्या जागेसाठी ग्राहकांच्या विविध मागण्यांमुळे, या ब्रँडने टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये जोरदार वाढ अनुभवली आहे.

भारतातील किचन आणि डायनिंग फर्निचर मार्केट 2025 मध्ये 251.32 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर 2030 पर्यंत ती 2.28% सीएजीआर दराने वाढेल. नवीन उत्पादनांचे लाँच, 120 शहरांमधील 250 ठिकाणी किचन गॅलरींचे वाढते प्रमाण, आणि महाराष्ट्रातील खालापूर येथील दररोज 250 पर्यंत किचन ऍक्सेसरीजचे उत्पादन करणाऱ्या प्रगत उत्पादन सुविधेमुळे इंटेरिओ या वाढीला मागे टाकण्यासाठी सज्ज आहे.

गोदरेजच्या 'इंटेरिओ'चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्राहक व्यवसाय प्रमुख, देव नारायण सरकार म्हणाले, “भारतीय स्वयंपाकघर म्हणजे आता केवळ एक उपयुक्त जागा राहिलेली नाही, तर ते जीवनशैलीचे एक प्रतीक बनते आहे. आजच्या ग्राहकांना असे मॉड्यूलर उपाय हवे आहेत, जे डिझाइन, कार्यक्षमता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा यांचा मेळ घालतील. या बदलत्या आकांक्षांमुळेच आम्ही वेगाने प्रगती करत आहोत. आणि आता आमच्या विक्रीपैकी 35% विक्री टियर 2-3 शहरांमधून होत आहे, जी आर्थिक वर्ष 24 मध्ये 24 टक्के होती.”

इंटेरिओने आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 'किचन कॉन्फिगरेटर' लाँच केले आहे, ज्यामुळे ग्राहक 3D मॉडेलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या स्वप्नातील स्वयंपाकघरची कल्पना करू शकतात. स्वयंपाकघरांच्या मूलभूत मांडणीसाठी डिझाइन केलेले पूर्वनिर्धारित मॉड्यूल्स या प्लॅटफॉर्मवर बघता येतात. याची किंमत 1.25 लाख रुपयांपासून सुरू होते. ग्राहक कॉन्फिगरेटरद्वारे थेट जवळच्या डीलरशी संपर्क साधून विशिष्ट जागा आणि बांधकामविषयक आवश्यकतांच्या अनुषंगाने स्वतःच्या आवडी-निवडी सांगू शकतात.

इंटिरिओच्या किचन विभागातील प्रमुख उत्पादनांपैकी एक म्हणजे 'स्टील शेफ', जे मध्यम प्रीमियम विभागासाठी मॉड्यूलर स्टील किचनची श्रेणी प्रदान करते, ज्यात टिकाऊपणा, सौंदर्यशास्त्र आणि वैयक्तिक पसंतीचे पर्याय यांचे उत्तम एकत्रीकरण आहे. भारतीय स्वयंपाकघरातील नेहमीच्या अडचणींवर मात करण्यासाठी इंटिरिओ स्मार्ट चिमनी, टॉल कॉर्नर युनिट, 2200 युनिट्स, टॉल पुल-आउट युनिट्स (7 फूट) यांसारख्या महत्त्वाच्या ॲक्सेसरीजचे उत्पादन देखील करते.

अनुकूलता आणि जागेचा कार्यक्षम वापर यामुळे, एल-आकाराचा किचन लेआउट भारतीय ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. इंटरिओचे मॉड्यूलर सीकेडी (कम्प्लीटली नॉक्ड डाउन) युनिट्स आधुनिक सेवा उपकरणांसह वेगाने कार्यान्वित करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. पूर्वीच्या पद्धतीनुसार, सुताराने बनवलेल्या स्वयंपाकघरांमध्ये, सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागण्यासाठी सरासरी 5-7 दिवस लागत. वेगाने विकसित होत असलेल्या मार्केटमध्ये स्वतःचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी इंटरिओ स्मार्ट होम इंटिग्रेशन, टिकाऊ साहित्य, बायोफिलिक डिझाइन घटक आणि बहुउद्देशीय फर्निचर यांसारख्या उदयोन्मुख ट्रेंडचा फायदा घेण्याची योजना आखते आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande