आदिवासी विकास विभाग राज्यस्तरीय आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धेत नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद
नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)। आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद 524 गुणांसह नाशिक विभागाला मिळाले. तर नागपूर विभागाने 439 गुणांसह उपविजेतेपदाला
नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद


नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)।

आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय आश्रमशाळांच्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद 524 गुणांसह नाशिक विभागाला मिळाले. तर नागपूर विभागाने 439 गुणांसह उपविजेतेपदाला गवसणी घातली. 211 गुणांसह ठाणे विभागाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर यजमान अमरावती विभाग (180 गुण) गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर राहिला. वैयक्तिक क्रीडा प्रकार नाशिक विभागाच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व निर्माण केला.

अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर

आदिवासी विकास विभाग अधिनस्त शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा रंगल्या. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी (दि.७) अपर आयुक्त आयुषी सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर अपर आयुक्त दिनकर पावरा, उपायुक्त संतोष ठुबे, दिगंबर चव्हाण, श्रीकांत धोटे, सहायक आयुक्त दिलीप खोकले, निलेश अहिरे, प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, विकास राचेलवार, उमेश काशीद, सुनील बारसे, प्रमोद पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी विनोद करडमारे, सुनील कायंदे, अनिल महाजन आदी उपस्थित होते.

लोहे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचालनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त ठुबे यांनी केले. दरम्यान, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू गणेश मुट्टमी व कल्याणी चौधरी (14 वर्षांखालील वयोगट), पिंगलाल पावरा व श्रेया सुदेवाड (17 वर्षांखालील वयोगट) तसेच हेमंत पांनडगळे व रोशनी पुंगाटी (19 वर्षांखालील वयोगट) यांना मान्यवरांच्या हस्ते सायकल देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचा अंतिम निकाल

कबड्डी : 14 वर्षे- ठाणे (मुले), ठाणे (मुली), 17 वर्षे- अमरावती (मुले), अमरावती (मुली), 19 वर्षे- अमरावती (मुले), अमरावती (मुली)

खो-खो : 14 वर्षे- नाशिक (मुले), नाशिक (मुली), 17 वर्षे- नाशिक (मुले), नाशिक (मुली),

19 वर्षे- नाशिक (मुले), नाशिक (मुली)

व्हॉलीबॉल : 14 वर्षे- नागपूर (मुले), नाशिक (मुली), 17 वर्षे- अमरावती (मुले), ठाणे (मुली), 19 वर्षे- अमरावती (मुले), नाशिक (मुली)

हँडबॉल : 14 वर्षे- नाशिक (मुले), नाशिक (मुली), 17 वर्षे- नागपूर (मुले), नाशिक (मुली), 19 वर्षे- अमरावती (मुले), नागपूर (मुली)

रिले 100 मीटर : 14 वर्षे- नाशिक (मुले), नाशिक (मुली), 17 वर्षे- नाशिक (मुले), नागपूर (मुली), 19 वर्षे- ठाणे (मुले), नाशिक (मुली)

रिले 400 मीटर : 17 वर्षे- नागपूर (मुले), नागपूर (मुली), 19 वर्षे- नागपूर (मुले), नागपूर (मुली).

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande