

नवी मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.) : हाउस ऑफ पीएनजी अंतर्गत येणाऱ्या आधुनिक आणि हलक्या दागिन्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लाइटस्टाईल बाय पीएनजी ज्वेलर्स या ब्रँडने खारघर, नवी मुंबई येथे आपल्या नवीन स्वतंत्र स्टोअरचे उद्घाटन करून आपल्या विस्ताराचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सेक्टर १२, खारघर येथे स्थित हे ९०० चौ.फुटांचे स्टोअर शहरी, स्टाईल-सजग ग्राहकांच्या बदलत्या आवडी लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. दैनंदिन वापर तसेच खास प्रसंगांसाठी योग्य असलेल्या हलक्या वजनाचे पण लक्ष वेधून घेणारे आकर्षक दागिने येथे उपलब्ध आहेत. फॅशन आयकॉन सारा तेंडुलकरच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले असून, यासह लाइटस्टाईलच्या एकूण स्वातंत्र्य स्टोअर्सची संख्या सहा झाली आहे.
या स्टोअरमध्ये 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यातील दागिने तसेच 18 कॅरेट सोन्यात घडवलेले हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत. लाइटस्टाईलच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत, येथे सादर करण्यात आलेली डिझाइन्स आधुनिक, बहुउपयोगी आणि वापरण्यास सोपी असून, पीएनजी ज्वेलर्सच्या विश्वासार्हतेचा आणि कारागिरीचा वारसा जपणारी आहेत.
उद्घाटनानिमित्त, लाइटस्टाईलकडून सर्व लाइटस्टाईल ज्वेलरीवरील मेकिंग चार्जेसवर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येत असून, ही ऑफर ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वैध आहे. कमी किमतींसह परंपरा जपत आधुनिक सौंदर्यदृष्टी, यांचा मेळ घालणारी फाइन ज्वेलरी ग्राहकांनी अनुभवावी, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
उद्घाटनप्रसंगी सारा तेंडुलकर म्हणाली,“लाइटस्टाईल आजच्या महिलांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे, हलक्या वजनाचे आणि दैनंदिन वापरासाठी योग्य असे दागिने प्रदान करते. दैनंदिन वापरासाठी फाइन ज्वेलरी अधिक सहज, सोपी आणि उपयुक्त बनवणाऱ्या लाइटस्टाईल ब्रँडच्या प्रवासाचा भाग असल्याचा मला आनंद आहे.”
लाइटस्टाईल बाय पीएनजीचे मार्केटिंग आणि ई-कॉमर्स हेड हेमंत चव्हाण म्हणाले,“खारघर हे वेगाने विकसित होत असलेले आणि आधुनिक जीवनशैली असलेले निवासी क्षेत्र आहे. येथे स्वतंत्र लाइटस्टाईल स्टोअर सुरू केल्यामुळे उत्तम डिझाइन्सच्या हलक्या वजनाचे दागिने पसंत करणाऱ्या ग्राहकांशी आम्हाला थेट संवाद साधता येईल. लाइटस्टाईलचा विस्तार प्रमुख शहरी बाजारपेठांमध्ये करण्याच्या दृष्टीने आमच्या योजनेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”
प्रत्येक नव्या दालनासोबत, लाइटस्टाईल बाय पीएनजी ज्वेलर्स आधुनिक डिझाइन आणि पिढ्यान्पिढ्या निर्माण झालेल्या विश्वासाच्या वारशाचा संगम साधत, समकालीन फाइन ज्वेलरीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून आपली ओळख अधिक भक्कम करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी