
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। टेक दिग्गज ओप्पोच्या सब-ब्रँड रिअलमीने भारतीय बाजारात आपली नवी रिअलमी 16 प्रो 5G सिरीज आणि नवीन रिअलमी पॅड 3 5G टॅबलेट सादर केला आहे. रिअलमी 16 प्रो 5G सिरीज अंतर्गत दोन मॉडेल्स लॉन्च करण्यात आले असून त्यात रिअलमी 16 प्रो 5G आणि रिअलमी 16 प्रो+ 5G यांचा समावेश आहे. या सिरीजची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर रिअलमी पॅड 3 5G टॅबलेटची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू होते.
रिअलमी 16 प्रो 5G तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आहे. 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 33,999 रुपये आकारण्यात आले आहेत, तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे. निवडक क्रेडिट कार्डवर कंपनीकडून 3,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंटही देण्यात येणार आहे. रिअलमी 16 प्रो+ 5G सुद्धा तीन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या बेस व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 41,999 रुपये आणि 12GB RAM व 256GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड 16 आधारित रियलमी यूआय 7.0 वर चालतात आणि ड्युअल सिम सपोर्टसह येतात. रिअलमी 16 प्रो+ 5G मध्ये 6.8 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून 144Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 6,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. रिअलमी 16 प्रो 5G मध्ये 6.78 इंचाचा थोडा छोटे डिस्प्ले पॅनल असून 1,400 निट्स ब्राइटनेस आणि 450 ppi पिक्सेल डेन्सिटी दिली आहे.
प्रोसेसर विभागात रिअलमी 16 प्रो+ 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 हा 4nm ऑक्टा-कोर चिपसेट आणि Adreno 722 GPU देण्यात आला आहे, तर रिअलमी 16 प्रो 5G मध्ये 4nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 मॅक्स 5G प्रोसेसर आणि Mali G615 GPU देण्यात आला आहे. दोन्ही फोन IP66, IP68 आणि IP69K प्रमाणित असून धूळ व पाण्यापासून संरक्षण देतात.
कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांकडे पाहिल्यास दोन्ही मॉडेल्समध्ये 200 मेगापिक्सलचा प्राथमिक रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. रिअलमी 16 प्रो 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर तर प्रो+ मॉडेलमध्ये 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. फ्रंटला दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून Pro+ मॉडेलद्वारे 4K रिजोल्यूशनमध्ये 60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 7,000mAh क्षमतेची बॅटरी असून 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4 आणि USB Type-C पोर्ट उपलब्ध आहेत. Realme 16 Pro+ 5G चे मास्टर गोल्ड व्हेरिअंट 8.49mm जाड असून वजन सुमारे 203 ग्रॅम आहे, तर Realme 16 Pro 5G चे वजन सुमारे 192 ग्रॅम आणि जाडी 7.8mm आहे.
स्मार्टफोन सिरीजसह कंपनीने भारतात रिअलमी पॅड 3 हा नवा 5G टॅबलेटदेखील लॉन्च केला आहे. या टॅबलेटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 मॅक्स प्रोसेसर, 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. यात 11.61 इंचाचा 2.8K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. 12,200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती 45W फास्ट चार्जिंग आणि 6.5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते.
रिअलमी पॅड 3 च्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला Wi-Fi व्हेरिअंट 26,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे, तर 5G व्हेरिअंटसाठी 29,999 रुपये आणि 31,999 रुपये अशी किंमत ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट शॅम्पेन गोल्ड आणि स्पेस ग्रे रंगांमध्ये मिळणार आहे. विक्री 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता रिअलमीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर सुरू होणार असून लॉन्च ऑफरमध्ये 2,000 रुपयांचा बँक डिस्काउंट दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule