
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.)। चीनी टेक दिग्गज शाओमीच्या सब-ब्रँड रेडमीने भारतीय बाजारात आपल्या नोट सिरीजचा विस्तार करत रेडमी नोट 15 5G हा नवा स्मार्टफोन आणि रेडमी पॅड 2 प्रो 5G हा नवा टॅबलेट लॉन्च केला आहे.
रेडमी नोट 14 5Gचा उत्तराधिकारी म्हणून सादर करण्यात आलेल्या या नव्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 चिपसेट देण्यात आला असून कंपनीच्या मते तो मागील जनरेशनपेक्षा 30 टक्क्यांहून अधिक वेगवान मल्टीटास्किंग परफॉर्मन्स देतो. फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा तसेच 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 4K 30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही यात उपलब्ध आहे. 5,520mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.77 इंचाची 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले, 3,200 निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन हे या फोनची वैशिष्ट्ये आहेत.
रेडमी नोट 15 5G अँड्रॉइड 15 आधारित HyperOS 2 वर चालतो आणि कंपनीने चार वर्षांचे OS अपडेट व सहा वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे. या फोनची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 19,999 रुपये तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 21,999 रुपये अशी ठेवण्यात आली आहे. या किंमतीत बँक ऑफर्सचा समावेश असून Axis, ICICI आणि SBI कार्ड व्यवहारांवर अतिरिक्त 3000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. यासोबतच दोन महिने YouTube Premium, तीन महिने Spotify Premium Standard आणि सहा महिने Google One ऍक्सेस मोफत देण्यात येत आहे.
याच कार्यक्रमात रेडमीने आपला रेडमी पॅड 2 प्रो 5G हा नवा टॅबलेटही लॉन्च केला. 12.1 इंचाच्या 2.5K डिस्प्लेसह, 120Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision सपोर्ट आणि 12,000mAh क्षमतेची बॅटरी हे या टॅबलेटचे मुख्य आकर्षण आहे. तो अँड्रॉइड 15 आधारित HyperOS 2 वर चालतो आणि कंपनी पाच वर्षांचे OS अपडेट व सात वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देणार असल्याचा दावा करत आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे.
रेडमी पॅड 2 प्रो 5G ची किंमत भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या फक्त Wi-Fi मॉडेलसाठी 22,999 रुपये, तर Wi-Fi + 5G मॉडेलसाठी 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या Wi-Fi + 5G व्हेरिएंटची किंमत 27,999 रुपये असून निवडक बँक कार्डवर 2,000 रुपयांपर्यंत तात्काळ सूट मिळू शकते. दोन्ही उत्पादने लवकरच कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule