व्हेनेझुएलातील अमेरिकी लष्करी कारवाईबाबत एस. जयशंकर यांचे सर्व पक्षांना शांततेचे आवाहन
नवी दिल्ली , 07 जानेवारी (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी व्हेनेझुएलामधील अमेरिकन लष्करी कारवाईबाबत चिंता व्यक्त केली. लक्झेंबर्ग दौऱ्यावर असताना, जयशंकर यांनी सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित पक्षांना जनतेच्
व्हेनेझुएलातील अमेरिकी लष्करी कारवाईबाबत एस. जयशंकर यांचे सर्व पक्षांना शांततेचे आवाहन


नवी दिल्ली , 07 जानेवारी (हिं.स.)।भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी व्हेनेझुएलामधील अमेरिकन लष्करी कारवाईबाबत चिंता व्यक्त केली. लक्झेंबर्ग दौऱ्यावर असताना, जयशंकर यांनी सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित पक्षांना जनतेच्या कल्याणाला आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केला. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आणि व्हेनेझुएलामध्ये एका रात्रीत सर्व परिस्थिती बदलून गेली. या घटनेमुळे संपूर्ण जग चकित झाले आहे. दरम्यान, या प्रकरणावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले, “होय, व्हेनेझुएलातील परिस्थितीबाबत आम्ही चिंतित आहोत. सर्व पक्षांनी एकत्र बसून संवादाच्या माध्यमातून या समस्येचे निराकरण करावे, असे आम्ही आवाहन करतो. हे व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. व्हेनेझुएलासोबत आमचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत, त्यामुळे तेथील नागरिक सुरक्षित राहावेत, ही आमची इच्छा आहे.”सध्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर लक्झेंबर्ग दौऱ्यावर असून तेथील उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेव्हियर बेटेल यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर त्यांनी हे विधान केले.

याआधीच रविवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत सर्व पक्षांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले होते. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की काराकास येथील भारतीय दूतावास व्हेनेझुएलामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीयांच्या सतत संपर्कात आहे. तसेच भारतीय नागरिकांनी काही काळासाठी व्हेनेझुएलाला प्रवास करू नये, असे आवाहनही करण्यात आले होते. याशिवाय भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन मदत हेल्पलाईन क्रमांक +58-412-9584288 जाहीर करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande