
मुंबई, 09 जानेवारी, (हिं.स.)। मराठी मनोरंजनविश्वातील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री 'वल्लरी विराज' 'शुभ श्रावणी' या नवीन मालिकेतून पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करत आहे. या मालिकेत ती शिक्षणमंत्र्यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना वल्लरीनी अनेक गोष्टी उलगडल्या.
माझ्या नवीन मालिकेचं नाव 'शुभ श्रावणी' आहे आणि माझं नाव मालिकेत श्रावणी आहे. ती एक शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे आणि म्हणून घरी प्रेमळ आपुलकीच वातावरण नसून कडक नियमबद्ध असं वातावरण आहे. श्रावणीला आई नाहीये, तिचे बाबा पण तिच्याशी बोलत नाहीत. श्रावणीकडे पैसे मालमत्ता भरपूर आहे, तिच्या वडिलांनी सुखसोयी म्ह्णून मोठा बंगला, गाडी, कपडालत्ता, नोकर... सगळ्या सुविधा तिच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. पण तिच्याकडे तिच्या बाबांचं प्रेमचं नाही. मुळात तिला माहिती पण नाही की का तिच्या बाबांनी लहानपणापासून तिच्याकडे बघितलं नाही. का ते तिच्याशी प्रेमाने बोलले नाहीत, का तिच्याशी ते असं तुटक वागतात? त्याच मूळ काय कारण आहे? तेही तिला माहित नाही. त्यामुळे श्रावणीचा सारखा प्रयत्न असतो, कि असं काय करू जेणेकरून बाबा तिच्याकडे लक्ष देतील, ते तिच्याशी बोलतील. कदाचित परीक्षेत चांगले मार्क आणले कि ते तिच्याशी बोलतील म्हणून ती भरपूर अभ्यास करते. तरीही तिला हवी तशी दाद आपल्या वडिलांकडून मिळत नाही. 'नवरी मिळे हिटलरला' मालिका संपल्यानंतरच मला खरंतर झी मराठीने सांगितलं होत कि तुझ्या सोबत परत काम करायला आम्हाला आवडेल, मी हि त्याक्षणाची वाट पाहत होते, आणि चार-पाच महिन्यानंतर मला कॉल आला, कि आम्हाला तुझ्या सोबत परत काम करायचंय, आमची 'शुभ श्रावणी' मालिका येतेय त्यात श्रावणी व्यक्तिरेखेची भूमिका तूच करायचीय अशी आमची इच्छा आहे आणि मला ते ऐकून खूपच आनंद झाला, नकार देण्याचा काही विषयच नव्हता, आणि अजिबात दुसरा तिसरा काहीच विचार न करता मी मालिका स्वीकारली. या भूमिकेसाठी खास तयारी केली आहे.माझी आधीची जी भूमिका होती लीलाची, ती खूपच उत्साही, अल्लड होती. परंतु आता श्रावणी आहे ती समजूतदार, सोज्वळ आणि शांत अशी आहे, मनात कितीही तिला वाईट वाटलं असेल, तिच्या मनात कितीही प्रश्नांचा कल्लोळ असला तरी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वावर करणारी अशी आहे. लीला आणि श्रावणी ह्या परस्पर विरुद्ध व्यक्तिरेखा आहेत त्यामुळे मला थोडी जास्त मेहनत करायला लागतेय.
श्रावणीची भूमिका करताना खरंतर थोडस हे आव्हानात्मक सुद्धा वाटत कारण बऱ्याच भावनांचा मेळ ह्या भूमिकेत मला दाखवायला लागतोय, मी मुळात माझ्या वैयक्तिक आयुष्यात जशी आहे तशी श्रावणी अजिबात नाहीये आणि ते भूमिकेत मला करायला मिळतंय, जे खरंच खूप छान आहे आणि मला त्याची मज्जा येतेय आणि प्रेक्षकांनाही माझी ही वेगळी बाजू श्रावणीच्या भूमिका पाहायला आवडेल, ह्याची मला खात्री आहे. प्रेक्षकांचा पहिल्या प्रोमो पासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रोमो मध्ये माझा चेहरा दिसत नव्हता तरीही प्रेक्षकांनी ओळखलं कि हि वल्लरी आहे, तो खूपच सुखद अनुभव होता माझ्यासाठी. प्रेक्षकांचं आजही तेवढंच प्रेम मिळतंय, ते खूप मेसेज करतायत, कंमेंट्स करतायत, मला टॅग करतायत, सगळेच म्हणतायत आम्ही वाट बघत होतो कि तू कधी परत येतेस. ह्या सगळ्याने खूपच छान, वाटतंय, पण ह्याने जबाबदारी हि वाढलीय, आता ह्याची सुद्धा जाणीव होतेय. त्यामुळे थोडस दडपण हि आहे कि आता जास्त चांगलं काम करायचंय. मी प्रेक्षकांच्या अपेक्षांना खर उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे.
आमच्या टीम बद्दल सांगायचे झालेतर आमच्या मालिकेची टीम खूपच मस्त आहे, लोकेश गुप्तेजी माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, आसावरी जोशी माझ्या आत्याचं काम करतायत. असं माझं कुटुंब आहे आणि त्यांच्या सोबत माझं खूप छान जमत. मधल्या वेळेत आम्ही गप्पा मारतो, काही ना काही थट्टा मस्करी करतो, काही ना काही आमचं सेटवर चालू असत. आधीच्या मालिकेतल्या सानिका काशीकर आणि भुमीजा पाटील ह्या पुन्हा माझ्यासोबत ह्या मालिकेत आहेत त्यामुळे आम्हा तिघीना तर खरंच खूप छान वाटतय आम्ही तिघी परत एकत्र काम करणार ह्याचा आम्हाला अधिक आनंद आहे.शूटिंग दरम्यानचा काही किस्सा सांगायचं झालं तर, ह्या मालिकेत जो मुख्य अभिनेता आहे सुमित पाटील त्याच आणि माझं पण पहिल्या दिवसापासूनच खूप छान भूमिका जमून आली आहे, त्याच्या सोबत हि शूट करताना खूप मज्जा येतेय, त्याचे आणि माझे थोडे असे हलके फुलके, टॉम अँड जेरी सारखे सीन असतात त्यामुळे धमाल येते काम करताना. आमचं प्रोमोचं शूटिंग आणि मालिकेच्या काही सीन्सच शूटींग हे कोल्हापूरला होत, आम्ही सगळे कलाकार तिथेच भेटलो.
अजून एक किस्सा सांगायचा झाला तर शूटिंग सुरु झाल्यावर माझ्यासोबत एक अपघातही झाला ज्यात माझ्या खांद्याला दुखापत झाली आणि तुम्ही माझ्या सोशल मीडियावर पहिलेच असेल मी हाताला पट्टी बांधली आहे. प्रेक्षकांना काळजी करण्यासाठी कारण नाही कारण मी रिकव्हरी करत आहे, सेटवर माझी खूप काळजी घेतली जात आहे. मला तुम्हाला भेटण्याची इतकी उत्सुकता लागून राहिली आहे कि मी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून आम्ही सर्व जण काळजी घेत आहोत. तर १९ जानेवारीला संध्याकाळी ७ वा. मला भेटायला नक्की या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर