सुस्मिता देशमुख 8 वेळा ठरली महाराष्ट्राची सीनियर सर्वोत्कृष्ट महिला पॉवरलिफ्टिंगपटू
ठाणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, येथे महाराष्ट्र राज्य क्लासिक सीनियर, मास्टर 1,2,3,4 पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 200 पेक्षा जास्त स्पर्धकांना सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडू क
ठाणे


ठाणे, 26 फेब्रुवारी, (हिं.स.)। ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा, येथे महाराष्ट्र राज्य क्लासिक सीनियर, मास्टर 1,2,3,4 पॉवर लिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 200 पेक्षा जास्त स्पर्धकांना सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडू कुमारी- सुस्मिता सुनील देशमुख हिने 52 किलो वजनी गटात 380 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बहुमान मानला जाणारा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू (strong woman of maharashtra) 2026 पटकाविले.

सलग 8 वर्ष महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकाविले आहेत. तसेच 31 जानेवारी 2026 रोजी श्री कृष्ण खामकर विद्यालय, येथे ठाणे जिल्हा स्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली होती, त्या स्पर्धेत सुस्मिता सुनील देशमुख हिला सुवर्णपदक तसेच सलग 9 वर्ष सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठाणे जिल्हा (strong woman of thane district))2026 मिळवत जोरदार कामगिरी केली.

ठाण्याच्या रीओ फिटनेस व्यायाम शाळेत सराव करते तसेच प्रशिक्षण श्री- किरण देवीदास सनस , कु- स्वप्निल पाटील यांच्या मदतीने या स्पर्धेत यश मिळविले. यशाचे श्रेय रीओ जिम टीम, प्रशिक्षक, आई-वडील वंदना सुनील, देशमुख, सुनील आत्माराम देशमुख यांना देते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande