भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन
नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी (हिं.स.)।भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह यांचे वडील खानचंद सिंह यांचे शुक्रवारी पहाटे सुमारे ४.३६ वाजता निधन झाले. त्यांना चौथ्या टप्प्यातील (स्टेज-४) लिव्हर कॅन्सर होता. गत मंगळवारी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन


नवी दिल्ली , 27 फेब्रुवारी (हिं.स.)।भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह यांचे वडील खानचंद सिंह यांचे शुक्रवारी पहाटे सुमारे ४.३६ वाजता निधन झाले. त्यांना चौथ्या टप्प्यातील (स्टेज-४) लिव्हर कॅन्सर होता.

गत मंगळवारी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील सेक्टर ओमेगा वनमधील यथार्थ हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते; मात्र त्यांची तब्येत सातत्याने बिघडतच होती.

वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळताच रिंकू सिंह यांनी मंगळवारी टीम इंडियाची साथ सोडून तातडीने घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी ते संघासोबत चेन्नई येथे होते. टी-२० विश्वचषकादरम्यान त्यांना संघाचा सराव सत्रही सोडावे लागले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबीय पार्थिव देह घेऊन आपल्या मूळ गावी अलीगढकडे रवाना झाले आहेत. रिंकू सिंह यांच्या यशामागे त्यांच्या वडिलांचे मोठे योगदान मानले जाते. संघर्षाच्या काळात त्यांनी मुलाचा आत्मविश्वास वाढवला आणि प्रत्येक टप्प्यावर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.या दुःखद प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील मान्यवर आणि चाहत्यांकडून कुटुंबियांसाठी शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच सामाजिक माध्यमांवरही श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

गेल्या काही वर्षांत रिंकू सिंह यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्फोटक फलंदाजी आणि सामना जिंकून देणाऱ्या खेळीसाठी ओळखले जाणारे रिंकू यांचा क्रिकेट प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. त्यांच्या वडिलांनी नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या क्रिकेटमधील स्वप्नपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande