बीड पालिकेचा २७५ कोटींचा अर्थसंकल्प; महसुली उत्पन्नातून विकासाला गती
बीड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.) - बीड नगरपरिषदेने सन २०२६-२७या आर्थिक वर्षासाठीचा आपला वार्षिक अर्थसंकल्प (अंदाजपत्रक) जाहीर केला आहे. या आगामी वर्षात नगरपरिषदेने एकूण २७५ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले असून, हा अर्थसंकल्प शिल
बीड पालिकेचा २७५ कोटींचा अर्थसंकल्प; महसुली उत्पन्नातून विकासाला गती


बीड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.) - बीड नगरपरिषदेने सन २०२६-२७या आर्थिक वर्षासाठीचा आपला वार्षिक अर्थसंकल्प (अंदाजपत्रक) जाहीर केला आहे. या आगामी वर्षात नगरपरिषदेने एकूण २७५ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले असून, हा अर्थसंकल्प शिलकी स्वरूपाचा आहे. ३१ मार्च २०२७ अखेर ७ लाख ५० हजार रुपयांची शिल्लक अपेक्षित धरण्यात आली आहे.

बीड शहरातील विविध विकासकामे, आस्थापना खर्च, आरोग्यसेवा, दिवाबत्ती आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सेवांवर नगरपरिषद २७४ कोटी ९९ लाख रुपये खर्च करणार आहे. या नियोजित खर्चानंतर नगरपरिषदेच्या तिजोरीत ७ लाख ५० हजार रुपये शिल्लक राहणार आहेत. भांडवली जमा रकमेचा मोठा हिस्सा (१५७.८२ कोटी) हा शहरातील रस्ते, नाली बांधकाम आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. महसुली उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे पगार आणि दैनंदिन स्वच्छतेची कामे पूर्ण केली जातील. नगरपरिषदेने मांडलेला हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वागीण विकासासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande