परभणी - गंगाखेड तालुक्यातील सिरसम गाव प्लास्टिक मुक्तीचा संकल्प घेणार
परभणी, 02 मार्च (हिं.स.) : गंगाखेड तालुक्यातील सिरसम गावाच्या ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनासाठी आणि गावाच्या हितासाठी प्लास्टिक मुक्तीचा प्रेरणादायी संकल्प केला आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी स्वनिधीतून स्टीलची ताटे आणि ग्लास खरेदी करून गावातील
सिरसमच्या ग्रामस्थांनी सोडला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प स्वनिधीतून स्टिलची ताटे व ग्लास खरेदी ः प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती


परभणी, 02 मार्च (हिं.स.) : गंगाखेड तालुक्यातील सिरसम गावाच्या ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनासाठी आणि गावाच्या हितासाठी प्लास्टिक मुक्तीचा प्रेरणादायी संकल्प केला आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी स्वनिधीतून स्टीलची ताटे आणि ग्लास खरेदी करून गावातील उपक्रमासाठी सुपूर्त केले आहेत.

सदर उपक्रमात श्रीहरी मुंढे, अनंता मुरकुटे, राम मुरकुटे, मंगेश मुंढे, सुधाकर केंद्रे, भरत कासले, बळीराम खोडके, लक्ष्मण मुरकुटे, सुरेश गंगनर, ज्ञानोबा श्रीरामे, राजाभाऊ मुरकुटे, बालाजी कोरडे, सचिन मुरकुटे, चंद्रकांत मुरकुटे, नामदेव मुरकुटे, गोविंद गंगनर, संतोष मुरकुटे, गणपत मुरकुटे, विष्णु मुरकुटे, कैलास मुंढे आदींनी सहभाग घेतला.

संपूर्ण गावात प्लास्टिक मुक्तीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही प्रेरणा इतर नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उपक्रमात सरपंच सौ. विमलताई व्यंकटराव केंद्रे आणि ग्रामसेवकांनी देखील सहभाग घेतला आणि गावातील इतर नागरिकांना देखील सहभागी होण्याचे आवाहन केले.

या संकल्पामुळे सिरसम गाव भविष्यात पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त गाव म्हणून उदाहरणीय ठरू शकते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande