अकोला येथे 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन
अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची 6 मार्च 2026 रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यंदा शिवजयंतीचे 32 वे वर्ष असून हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भव्य
Photo


अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची 6 मार्च 2026 रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यंदा शिवजयंतीचे 32 वे वर्ष असून हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भव्य दिव्य स्वरूपात पार पडावा यासाठी वानखडे नगर स्थित कर्ता हनुमान मंदिराच्या प्रांगणात समस्त शिवप्रेमींची बैठक पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवप्रेमींकडून काही महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन प्राप्त झाले. या बैठकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेविका माधुरी क्षीरसागर, नगरसेवक राहुल धोटे, मनोज पाटील, प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक नितीन ताकवाले, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे, मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, माजी स्थायी समिती सभापती विलास शेळके, रवी गोतमारे, कर्ता हनुमान मंदिराचे सर्वसेवाधिकारी सुभाष म्हैसने, माजी नगरसेवक सतीश ढगे, मनोज गायकवाड, योगेश गोतमारे, उद्धवसेनेचे निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, जिल्हासंघटक भूषण भिरड, डाबकी रोडवासी कावड मंडळाचे सर्वसेवाधिकारी संदीप पवार, आकाश कवडे, बालू गायकवाड, गुड्डू चोपडे, किरण मेटांगे, गजानन टिकार, सुनील महल्ले, नितीन वाडीकर, रवी दुतोंडे, वसंता मानकर, आशिष जानोरकार, सुरज शेळके, गणेश नंदनवार, धीरज सरोदे, रोहित ईचे, शुभम भिरड, रुपल पवार, ह्रिषिकेश भिरड, शिवम थोटे, हर्षल चौधरी, गोटू मडीवाले, प्रकाश गायकवाड, वासु जुनगडे, विनोद तायडे पाटिल, महेंद्र उगले, आदित्य केंदळे, विजय कवडे यांच्यासह डाबकी रोड परिसरातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिक व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

महिलांची मशाल यात्रा 5 मार्च रोजी

गुरुवार 5 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी नगरस्थित आई तुळजाभवानी मंदिर येथून महिलांच्या मशाल रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. 6.30 वाजता मशाल रॅलीचा प्रारंभ होईल. मशाल यात्रेचा समारोप जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात करण्यात येईल. यावेळी उपस्थित महिला व युवतींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन व त्यानंतर आरती केली जाणार आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा 6 मार्च रोजी

शुक्रवार 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या भव्यदिव्य आकर्षक किल्ल्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित शहरातील सामाजिक,क्रीडा, राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.

विशाल मिरवणूक

सायंकाळी 7 वाजता डाबकी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या महिला, युवती व चिमुकल्या मावळ्यांची उत्साह पूर्ण वातावरणात मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी नगरस्थित भाजी बाजार येथील शिवरायांच्या प्रतिमेसमोर करण्यात येईल. शनिवार 7 मार्च रोजी रात्री 8 वाजता शिवपूजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप केला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande