
कर्णकदूर`चा दावा कायम, कार अपघातामुळे वाडिया,गुलाटी,अभिमन्यू बाहेर
नाशिक, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
- ब्लु बँड आयएनआरसी (२०२५)तर्फे आणि विसाच्या आयोजनाखाली होत असलेल्या `रॅली ऑफ महाराष्ट्र`च्या सहाव्या फेरीत अपेक्षेप्रमाणे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मंगळूरच्या मस्कारेहास डीन-करुबाह गगन(टीएसआय रेसिंग) जोडीने सर्वीत्तम कामगिरी नोंदवत आपली विजेतेपदाकडे घौडदौड सुरुच ठेवली आहे. उद्या(ता.१) विजेतेपदाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असेल. दुसरीकडे उपविजेतेपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या आदित्य ठाकूर-विजेंदर कश्यप जोडीच्या कार रस्ता सोडून बाहेर जात अपघात झाल्याने ते रॅलीबाहेर पडले असून कर्णकदूर-मुसा शेरीफ जोडीचा उपविजेतेपदावर दावा कायम आहे.
सुपर स्पेशल स्टेजनंतरच्या आज सकाळ व दुपार सत्रात झालेल्या मुख्य फेरीत चांगली चुरस अपेक्षित होती मात्र उपविजेतेपदाचा दावेदार आदित्य ठाकूर,हरकिशन वाडिया,संजीवन अभिमन्यू,अनुश्रीया गुलाटी या स्पर्धेकांच्या गाडया रस्ता ट्रक सोडून खाली जाणे,पुलाच्या कथड्याला धडकत अपघात झाल्याने ते स्पर्धेबाहेर गेले आणि रॅलीतील चुरस ही एकतर्फीच झाली.
ताबा सुटल्याने कार रस्त्याबाहेर अन् अपघात
सकाळ सत्रात अपेक्षेप्रमाणे मस्कारेहास डीन-करूबाह गगन यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेत आपली घौडदौड सुरुच ठेवली. त्यांच्यातील वेळ अचूकता आणि कार चालविण्याचे नियंत्रण खरोखरच वागण्याजोगे होते, त्यानंतर कर्णकदूर-मुसा शेरीफ जोडीने संयमाने वळणावळणाचे डांबरे रस्ते,अचानक समोर येणारे उंचवटे सहजपणे पार करत आपली आघाडी कायम ठेवली. उपविजेतेपदाचा आणखी दावेदार ठाकूर-कश्यप जोडीकडून चांगली अपेक्षा होती मात्र मोरचुंडी, पोशेरा भागातील अवघड वळणाच्या ठिकाणी गाडीवर नियंत्रण न राखता आल्याने त्यांची कार ररत्यांच्या बाहेर जात एका पुलांच्या कोपऱ्याला धडकत खाली गेली.कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हानं संपुष्टात आले आहे. याच मार्गावर कमांडर सेंटरवरून पुढे जात असतांना हरिकिसन वाडीया या चालकांचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याबाहेर फेकली गेल्याने त्यानेही रॅली सोडून दिली.
गुलाटीला किरकोळ दुखापत,कार रस्त्यात अडवी
महिला गटातील एकमेव दावेदार अरेका मोर्टरसच्या अनुश्रीया गुलाटी-अकूता करन यांनी सुरवातीच्या सत्रात आघाडी घेत चांगली कामगिरी नोंदविण्याचा प्रयत्न केला,पण एक अवघड असलेले वळण लक्षात न आल्याने त्यांची कार रस्ता सोडून पूर्णपणे बाहेर गेली. यात गुलाटीला किरकोळ दुखापत झाली, या दोघी उद्या सकाळ सत्रातील फेरीत सहभागी होऊ शकतात. त्यांच्याप्रमाणेच स्नॅप रेसिंगचाय संजीवन अभिमून्य-सी.ए.अविनाश जोडीनेही तिच चूक केली. त्यांनाही वळण न वेगात असलेली कार रस्त्याबाहेर गेली व कारचे नुकसान झाले. गुलाटी-अभिमन्यू हे उद्या सकाळ सत्रातील रँलीत सहभागी होऊ शकतात मात्र त्यांना त्यांच्या गटातील बक्षिसांपासून वंचित रहावे लागले. नाशिकची रॅली ही स्पर्धेकांचा कस लावणारी ठरत असते त्याप्रमाणे आजचा दिवस हा कारचालकांची सत्वपरिक्षा पाहणारा आणि अपघातांनीच गाजला असेच म्हणावे लागेल. उद्या(ता.१ मार्च) सकाळ सत्रात पुन्हा मोरचुंडी, पोशेरा,कळंब,ओसिरावा,हिरवे या भागात चालकांचे कसब,कौशल्य पाहण्याची संधी ग्रामीण भागातील नागरीकांना मिळणार आहे. त्यानंतर दुपारी बारावाजता सपकाळ नॉलेज हब या सर्व्हिस पार्कच्या ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ होईल.
चालकांच्या नावाने घोषणा अन् मदतीसाठीही पुढे
या सहाव्या फेरीत डीन मस्कारेनहास त्याचा साथीदार करूमबाह गगन, कर्णकदूर- शेरीफ मुसा,आदित्य ठाकूर-विरेंद्र कश्यप, बी वैशाखा-चिरनाथ जैन, फबीद अहमद-जॉर्ज मिलेन यासारखे नावाजलेले चालक-सहचालक सहभागी झालेले, आजच्या सकाळ व दुपार सत्रातील चरणात आपले कौशल्य दाखवून पुढे जातांना प्रत्येक नावाजलेल्या टिमच्या चालक-सहचालकांच्या नावाने घोषणा देतांना दिसले. ग्रामीण, आदिवासी भागातील या बांधवांचा उत्साह अवर्णनीय असाच होता. अपघातांच्या ठिकाणी स्वतः मदतीसाठी येत या बांधवानी चालकांना तसेच त्यांची कारही बाजूला घेत मदतीचा हात दिला. दोन गाड्यांमधील समांतर झुंज प्रेक्षकांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. प्रत्येक वळणावर कारवरील नियंत्रण राखताना चालकांनी दाखवलेली धाडस आणि संतुलन या सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात कौतुकाने दाद दिली. त्याचप्रमाणे डोळ्यासमोर अपघात होतांना `अरे देवा` असे म्हणत त्यांच्या मदतीसाठी धावणारे हे ग्रामीण भागातील युवक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV