
-साहिबजादा फरहानचा समावेश नाही-टी-२० विश्वचषकात साहिबजादा फरहानच्या ३८३ धावा
नवी दिल्ली, 03 मार्च (हिं.स.)हंड्रेड २०२६ लिलावासाठी क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे, एकूण २४३ नावे आहेत. यापैकी 14 क्रिकेटपटू हे पाकिस्तानचे आहेत. पण टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा साहिबजादा फरहान या यादीतून गायब आहे. कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये रस दाखवला नाही. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफला मार्की प्लेअर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. १२ मार्च रोजी होणाऱ्या हंड्रेडमधील हा पहिला लिलाव आहे. गेल्या वर्षी हंड्रेड फ्रँचायझीचे खाजगीकरण करण्यात आले होते आणि यापैकी चार फ्रँचायझींचे आयपीएलशी संबंध आहेत.
२०२६ च्या टी२० विश्वचषकात फरहानने सहा डावांमध्ये ३८३ धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. तो एकाच टी-20 विश्वचषकामध्ये दोन शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याचे शतक श्रीलंका आणि नामिबियाविरुद्ध होते. एकाच टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. फरहानला हंड्रेडमध्ये निवडीसाठी दावेदार मानले जात होते. पण फ्रँचायझीने त्याला शॉर्टलिस्ट केले नव्हते. तो आतापर्यंत फक्त एकाच परदेशी टी-२० लीगमध्ये खेळला आहे. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये राजशाही वॉरियर्सकडून तो याआधी टी-20 लीगमध्ये खेळला आहे.
हंड्रेड लिलावासाठी ७१० क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३ पाकिस्तानी होते. त्यानंतर सर्व फ्रँचायझींना त्यांच्या पसंतीच्या ७५-१०० क्रिकेटपटूंची नावे सादर करण्यास सांगितले गेले. ही नावे मिळाल्यानंतर, लिलावासाठी फक्त २४३ क्रिेकेटपटू उरले, त्यापैकी १४ पाकिस्तानचे होते. रौफ व्यतिरिक्त, शाहीन आफ्रिदी, शादाब खान, उस्मान तारिक, सैम अयुब, अबरार अहमद, मोहम्मद नवाज, नसीम शाह, मोहम्मद आमिर, जमान खान, ओसामा मीर, इमाद वसीम, आकिब जावेद आणि सलमान मिर्झा यांचा समावेश होता. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी लिलावासाठी त्यांची नावे सादर केली नाहीत.
हंड्रेड लीगमध्ये आतापर्यंत नऊ पाकिस्तानी क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. त्यापैकी रौफ, शाहीन आणि आमिर हे प्रमुख आहेत. 'द हंड्रेड'चा पुढील हंगाम २१ जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान चालणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे