नांदेड - डॉ. शंकरराव चव्हाण यांना समाधीस्थळी चव्हाण कुटुंबियांनी केले अभिवादन
नांदेड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांना स्मृतिदिनी नांदेड येथील स्मृती संग्रहालय आणि धनेगाव, जि. नांदेड येथील समाधीस्थळी आदरांजली अर्पण करण्यात आली. नादेड तालुक्यातील वडगाव, धनेगाव येथे समाधी स्थळी जलनायक
अ


नांदेड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांना स्मृतिदिनी नांदेड येथील स्मृती संग्रहालय आणि धनेगाव, जि. नांदेड येथील समाधीस्थळी आदरांजली अर्पण करण्यात आली.

नादेड तालुक्यातील वडगाव, धनेगाव येथे समाधी स्थळी जलनायक, भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिता चव्हाण, आमदार अॅड. सुजया चव्हाण यांच्यासह चव्हाण कुटुंबीय व उपस्थित आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकत्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

वडगाव, धनेगाव ता. जि. नांदेड येथे समाधीस्थळी फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रारंभी खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह माजी आमदार अमिता चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण, सुजाया चव्हाण व कुटुंबातील सदस्य यांनी समाधीवर विधीवत पूजन केले. या नंतर कै. शंकरराव चव्हाण व के. कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजनकरून पुष्पहार अर्पण केला. यानंतर बिलोली, देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आ. जितेश अंतापूरकर, माजी आमदार तथा भाजपा महानगर नांदेड शहराध्यक्ष अमर राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, शंकरराव चव्हाण कारखान्याचे चेअरमन नरेंद्र चव्हाण, माजी चेअरमन गणपतराव तिडके, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे सभापती संजय लहानकर, यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पक्षाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande