बीड - शिरूर नगरपंचायतीवर महिलाराज, सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध
बीड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। शिरूर नगरपंचायतीमध्ये विषय सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्याने नगर पंचायतीचा कारभार आता महिला पाहणार आहेत. सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध होऊन सर्व सभापतिपदाची सूत्र ही महिलांच्या हाती आल्याने आता नगरपंचायतीवर म
बीड - शिरूर नगरपंचायतीवर महिलाराज, सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध


बीड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।

शिरूर नगरपंचायतीमध्ये विषय सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्याने नगर पंचायतीचा कारभार आता महिला पाहणार आहेत.

सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध होऊन सर्व सभापतिपदाची सूत्र ही महिलांच्या हाती आल्याने आता नगरपंचायतीवर महिलाराज आले आहे.

नगरपंचायत सभापतिपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्याने या निवडीसाठी नगरपंचायतीमध्ये बैठक घेण्यात आली. ही नगरपंचायत आमदार सुरेश धस यांच्याकडे असल्याने एका सभापतीपदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. वेळेचे बंधन पाळत बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. या प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून ज्योती चव्हाण व सहपीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांनी काम पाहिले. नगराध्यक्षा प्रतिभा गाडेकर पाटील यांच्याकडे स्थायी समिती, अर्थ व नियोजन समिती उपनगराध्यक्षा श्वेता देसरडा, सार्वजनिक बांधकाम सभापती सुनीता रणखांब, पाणीपुरठा, स्वच्छता व आरोग्य सभापती गयाबाई गायकवाड, महिला व बालकल्याण समिती वैजयंता तळेकर, उपसभापती संगीता गाडेकर यांची निवड करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande