
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी गुगलने भारतासह जागतिक बाजारात आपला नवीन एआय इमेज जनरेशन आणि एडिटिंग मॉडेल नॅनो बनाना 2 लॉन्च केला आहे. हा नवीन मॉडेल कंपनीच्या Gemini 3.1 Flash Image मॉडेलवर आधारित असून, नॅनो बनाना प्रो ची उच्च दर्जाची इंटेलिजन्स आणि व्हिज्युअल क्वालिटी तसेच Gemini Flash ची वेगवान एडिटिंग क्षमता यांचा संगम यात करण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना अधिक वेगवान, अचूक आणि आकर्षक इमेज तयार करण्याचा अनुभव मिळणार आहे.
नॅनो बनाना 2 मध्ये व्हिज्युअल जनरेशनसाठी Gemini Flash ची हाय-स्पीड इंटेलिजन्स देण्यात आली आहे. यामुळे वापरकर्ते झटपट एडिटिंग, बदल आणि सुधारणा करू शकतात. गुगलच्या माहितीनुसार, हा मॉडेल जेमिनी एआयच्या रिअल-वर्ल्ड नॉलेज बेस, रिअल-टाइम माहिती आणि वेब सर्चमधून मिळालेल्या प्रतिमांचा आधार घेतो. त्यामुळे तयार होणाऱ्या इमेज अधिक वास्तवदर्शी, माहितीपूर्ण आणि अचूक असतात. इन्फोग्राफिक्स, डेटा व्हिज्युअलायझेशन आणि नोट्सचे डायग्राममध्ये रूपांतर करणेही या मॉडेलमुळे सोपे झाले आहे.
नॅनो बनाना 2 च्या मदतीने मार्केटिंग मॉकअप, ग्रीटिंग कार्ड किंवा सोशल मीडिया पोस्टसाठी स्पष्ट आणि वाचनीय टेक्स्ट तयार करता येतो. इमेजमधील मजकूर थेट ट्रान्सलेट आणि लोकलाइज करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. यामुळे वेगवेगळ्या भाषांमधील प्रेक्षकांसाठी सामग्री तयार करणे अधिक सुलभ झाले आहे.
या नवीन मॉडेलमध्ये आधीच्या नॅनो बनाना आणि नॅनो बनाना प्रोच्या तुलनेत अनेक अपग्रेड्स देण्यात आले आहेत. एका वर्कफ्लोमध्ये पाच सब्जेक्ट्सपर्यंत एकसारखी कॅरेक्टर कन्सिस्टन्सी राखता येते आणि 14 ऑब्जेक्ट्सपर्यंत उच्च फिडेलिटी कायम ठेवता येते. त्यामुळे स्टोरीबोर्डिंग आणि कथानक आधारित कंटेंट तयार करण्यासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरते. तसेच, इन्स्ट्रक्शन फॉलोइंग क्षमता सुधारण्यात आली असून, जटिल सूचनांनाही हे मॉडेल अधिक अचूक प्रतिसाद देते.
नॅनो बनाना 2 512px पासून 4K पर्यंत विविध रिझोल्यूशन आणि आस्पेक्ट रेशियो सपोर्ट करतो. वर्टिकल सोशल मीडिया पोस्टपासून वाइड-स्क्रीन बॅकड्रॉपपर्यंत शार्प आणि रिच टेक्सचर असलेले व्हिज्युअल तयार करता येतात. अधिक स्पष्ट डिटेल्स, वायब्रंट लाइटिंग आणि उच्च दर्जाची एस्थेटिक्स जलद गतीने देण्याची क्षमता या मॉडेलमध्ये आहे.
नॅनो बनाना 2 सध्या भारत, अमेरिका, यूएई, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, प्यूर्टो रिको, जपान यांसह एकूण 141 देशांमध्ये उपलब्ध आहे. अरबी, बंगाली, चिनी, डच, इंग्रजी, फ्रेंच, हिब्रू, हिंदी, इंडोनेशियन, जपानी, कोरियन, मल्याळम, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश, थाई, उर्दू आणि व्हिएतनामी अशा 18 भाषांना तो सपोर्ट करतो. हा मॉडेल Gemini अॅप, Google अॅप, सर्चमधील AI मोड, AI स्टुडिओ, Gemini API, Flow आणि Google Ads यांसह कंपनीच्या विविध प्लॅटफॉर्मवर रोलआउट करण्यात आला आहे.
Google AI Pro आणि Ultra वापरकर्त्यांना Gemini अॅपमध्ये नॅनो बनाना प्रो चा प्रवेश कायम ठेवता येणार आहे. अॅपमधील तीन-डॉट रिजनरेशन मेनूमधून हे मॉडेल निवडता येईल. सर्वसाधारण वापरकर्त्यांसाठी नॅनो बनाना 2 हे डिफॉल्ट एआय इमेज जनरेशन मॉडेल म्हणून उपलब्ध असेल.
यासोबतच Google ने आपल्या कंटेंट प्रूव्हेनेन्स तंत्रज्ञानातही सुधारणा केली आहे. कंपनीने SynthID वॉटरमार्किंग टेक्नोलॉजीला इंटरऑपरेबल C2PA कंटेंट क्रेडेन्शियल्ससोबत जोडले आहे. SynthID ही तंत्रज्ञान एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये अदृश्य मार्कर एम्बेड करते. नोव्हेंबरमध्ये लॉन्च झाल्यापासून Gemini अॅपवर या तंत्रज्ञानाचा 20 दशलक्षांहून अधिक वेळा वापर झाला आहे. लवकरच Gemini अॅपमध्ये C2PA कंटेंट क्रेडेन्शियल्स व्हेरिफिकेशन सुविधा सुरू केली जाणार असून, एखादी इमेज एआयच्या मदतीने तयार केली आहे की नाही आणि कशी केली आहे याबाबत अधिक पारदर्शकता वापरकर्त्यांना मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule