आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.)ऑलिंपिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन आणि दोन वेळा विश्वविजेती निखत जरीन मंगोलिया येथे २८ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या २० सदस्यीय संघाचे नेतृत्व करतील. भारताने महिना
लव्हलिना बोरगोहेन


नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी (हिं.स.)ऑलिंपिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन आणि दोन वेळा विश्वविजेती निखत जरीन मंगोलिया येथे २८ मार्च ते ११ एप्रिल दरम्यान होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या २० सदस्यीय संघाचे नेतृत्व करतील. भारताने महिनाभर चाललेल्या सखोल मूल्यांकन प्रक्रियेनंतर २० सदस्यीय संघाची निवड केली. जानेवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेनंतर पटियाला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात संभाव्य बॉक्सिंगपटूंचा समावेश करण्यात आला आहे.

निवड धोरणानुसार, आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील अंतिम फेरीतील खेळाडूंची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी निवड केली जाणार आहे. ज्यामुळे या खंडीय स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे. स्पेनमधील बॉक्सम एलिट चॅम्पियनशिपमध्ये अलीकडेच सुवर्णपदक जिंकणारी लव्हलिना (७५ किलो) महिला संघाचे नेतृत्व करेल. स्पेनमधील इतर सुवर्णपदक विजेत्या प्रीती (५४ किलो), अरुंधती चौधरी (७० किलो) आणि प्रिया (६० किलो) यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. विद्यमान विश्वविजेती मीनाक्षी (४८ किलो) आणि जास्मिन (५७ किलो) यांचाही संघात समावेश आहे. महिला गटात, संघात समाविष्ट असलेल्या इतर खेळाडूंमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल सुवर्णपदक विजेती निकत जरीन (५१ किलो), अंकुशिता बोरो (६५ किलो), पूजा राणी (८० किलो) आणि अल्फिया तरन्नम अक्रम खान पठाण (+८० किलो) यांचा समावेश आहे.

पुरुष गटात, वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल आणि बॉक्सम चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेता सचिन (६० किलो) संघाचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत स्पेनमध्ये सुवर्णपदक जिंकणारा आकाश (७५ किलो) आहे. विश्वनाथ सुरेश (५० किलो), आदित्य प्रताप यादव (६५ किलो), लोकेश (८५ किलो), हर्ष चौधरी (९० किलो) आणि नरेंद्र (+९० किलो) हे संघात समाविष्ट असलेले इतर खेळाडू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande