
नांदेड, 28 फेब्रुवारी, (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल विभाग व कृषी विभागामार्फत तत्काळ पंचनामा करून प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी व शासनाच्या प्रचलित नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करून थेट खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी खासदार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. खासदार प्रा. रवींद्र जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रा. रवींद्र चव्हाण यांनी चव्हाण यांची मागणी निवेदनाद्वारे मागणी केली.
अनेक ठिकाणी काढणीस आलेली पिके भिजल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता घसरली असून, बाजारमूल्य कमी होण्याची शक्यता आहे. काही भागांत शेतजमिनी ओलसर राहिल्यामुळे उभी पिके नुकसानग्रस्त झाली आहेत. झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गहू, हरभरा या रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर आंबा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी आहे.
नायगाव तालुक्यातील वाऱ्यामुळे उभी असलेली गहू, ज्वारीची पिके कोलमडून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी कणसे मोडून चिखलात मिसळल्यामुळे काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. निसर्गाने होत्याचे नव्हते केले असल्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन तत्काळ भरीव मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार प्रा. चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis