अलिबाग बस आगार परिसरात नव्या पोलिस चौकीचे लोकार्पण
रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : अलिबाग येथील बस आगार परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीचे लोकार्पण रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. वाढती वर्दळ आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही चौकी कायदा व सुव्यवस्थ
Inauguration of a new checkpoint at the bus depot equipped with AI technology


रायगड, 28 फेब्रुवारी (हिं.स.) : अलिबाग येथील बस आगार परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीचे लोकार्पण रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. वाढती वर्दळ आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही चौकी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या चौकीचे नूतनीकरण व उभारणीचे काम यशोधन पतसंस्था यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. एस.टी. स्टँड परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष ऍड. मानसीताई म्हात्रे, डीवायएसपी माया मोरे, पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, आगार प्रमुख देवरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले की, बस स्थानक परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेता ही चौकी प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही भर देण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “समुद्र संदेश” व्हॉट्सऍप चॅनेलबाबत माहितीपर फलक चौकीच्या तीनही बाजूंना लावण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांना सुरक्षाविषयक संदेश आणि जनजागृतीपर माहिती देण्यात येणार आहे.तसेच पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले “न्याय सारथी” ॲप नागरिकांना तक्रार नोंदविणे सुलभ करणार आहे. “रायगड दृष्टी” या ॲपच्या माध्यमातून अवैध धंदे व अनुचित प्रकारांबाबत माहिती थेट पोलीस विभागापर्यंत पोहोचविणे सोपे होणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांकही चौकीवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande