माहूर नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
नांदेड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। माहूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप ठरविणारा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ९९ कोटी ८४ लाख ५२ हजार ६८३ रुपयांचे अंदाजपत्रक माहूर नगरपंचायतीच्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी
माहूर नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर


नांदेड, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।

माहूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप ठरविणारा २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ९९ कोटी ८४ लाख ५२ हजार ६८३ रुपयांचे अंदाजपत्रक माहूर नगरपंचायतीच्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली.

मुख्याधिकारी विवेक भारत कांदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नारायण लाड, नगरसेवक व अधिकारी यांच्या उपस्थितीत लेखापाल विशाल मरेवाड यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. माहूर तीर्थक्षेत्र असल्याने तीर्थस्थळांकडे जाणारे रस्ते विकसित करणे, तलावांचे

सुशोभीकरण, महापुरुषांच्या स्मारकांचा विकास तसेच प्रमुख चौकांचे आधुनिकीकरण यांना अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. माहूर शहराला तीर्थक्षेत्राला साजेशा आधुनिक नगररचनेचा दर्जा देण्याचा संकल्पनगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केला. अंदाजपत्रकावरील चर्चेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र केशवे, काँग्रेस गटनेते विलास भंडारे, शिवसेना गटनेत्या आशा जाधव, भाजप गटनेते सागर महामुने यांच्यासह नगरसेवक व अधिकारी सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande