इंस्टाग्रामवर मुलांनी आत्महत्याशी संबंधित शब्द सर्च केल्यास पालकांना पाठवणार अलर्ट
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। मेटा प्लॅटफॉर्म या कंपनीनं इंस्टाग्राम वर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं नवीन वैशिष्ट्य जाहीर केलं आहे. आत्महत्या किंवा स्वत:ला इजा करण्यासंबंधी शब्द वारंवार शोधल्यास आता पालकांना थेट अलर्ट पाठवला जाणार
Meta to send parents alerts


मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। मेटा प्लॅटफॉर्म या कंपनीनं इंस्टाग्राम वर किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं नवीन वैशिष्ट्य जाहीर केलं आहे. आत्महत्या किंवा स्वत:ला इजा करण्यासंबंधी शब्द वारंवार शोधल्यास आता पालकांना थेट अलर्ट पाठवला जाणार आहे. ही सुविधा इंस्टाग्रामच्या ‘पॅरेंटल सुपरव्हिजन’ साधनांचा भाग असून पालकांना वेळेवर सावध करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आठवड्यापासून ही सुविधा सुरू होणार असून सुरुवातीला अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमध्ये ती लागू केली जाणार आहे. त्यानंतर इतर देशांमध्ये टप्प्याटप्प्याने रोलआउट करण्यात येईल.

कंपनीच्या माहितीनुसार, जर एखाद्या किशोरवयीन वापरकर्त्यानं अल्प कालावधीत ‘suicide’ किंवा ‘self-harm’ सारखे शब्द वारंवार शोधले किंवा आत्महत्येला प्रोत्साहन देणारी वाक्ये सर्च केली, तर पालकांना ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा इंस्टाग्राम अॅपद्वारे सूचना मिळेल. या अलर्टमध्ये मुलानं किती वेळा असे शोध घेतले याची माहितीही दिली जाईल. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पालकांना मुलांशी संवेदनशील संवाद कसा साधावा याबाबत आवश्यक मार्गदर्शक संसाधनं उपलब्ध करून दिली जातील. एक-दोन वेळा शोध घेतल्यास अलर्ट पाठवला जाणार नाही, मात्र वारंवार आणि संशयास्पद शोध आढळल्यासच सूचना दिली जाईल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

इंस्टाग्रामवर आधीपासूनच आत्महत्येला प्रोत्साहन देणारा मजकूर ब्लॉक केला जातो. किशोरवयीन अकाउंट्सवर असा कंटेंट दिसत नाही आणि अशा शोधांवर मानसिक आरोग्याशी संबंधित हेल्पलाइन व मदत केंद्रांची माहिती दाखवली जाते. तात्काळ धोका जाणवल्यास आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याची तरतूदही करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भविष्यात एआय टूल्ससोबत झालेल्या संवादांवरही अशाच प्रकारचे अलर्ट देण्याची सुविधा विकसित केली जात असून त्याबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande