मुंबई-गोवा महामार्ग विहित कालावधीत पूर्ण होणार का? - आ. प्रवीण दरेकर
मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - होळीचा सण जवळ आला असून मुंबईकर चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गवरून प्रवास करत गावी जातात. मात्र प्रवास करताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे कामं विहित वेळेत पूर्ण होणार का? असा सव
मुंबई-गोवा महामार्ग विहित कालावधीत पूर्ण होणार का? - आ. प्रवीण दरेकर


मुंबई, 28 फेब्रुवारी (हिं.स.) - होळीचा सण जवळ आला असून मुंबईकर चाकरमानी मुंबई-गोवा महामार्गवरून प्रवास करत गावी जातात. मात्र प्रवास करताना त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे कामं विहित वेळेत पूर्ण होणार का? असा सवाल आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.

विधानपरिषदेचे सदस्य निरंजन डावखरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत आ. प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, होळीला गावी जाताना चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मुंबई-गोवा महामार्ग हा रेकॉर्डब्रेक लेट होणारा महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग मुंबई-गोवा महामार्गानंतर झाला. अनेक वर्षे कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे हा मार्ग रखडलाय.त्यामुळे विहित वेळेत मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार का? असा प्रश्नही दरेकरांनी विचारला. तसेच महाड येथे गांधारपाले ही लेणी आहे. तेथे मोठे पर्यटन स्थळ सुरु होऊ शकते. तेथे लागणाऱ्या व्यवस्थेसाठी बांधकाम खात्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही दरेकरांनी केली.

दरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, माणगाव-इंदापूर मार्गाचे कामं सूरु आहे. त्याची मुदत २०२७ पर्यंत आहे. चिपळूणचा पूल मे २०२६ पर्यंत खुला होणार आहे. हातखंबा उड्डाणपूलाचेही कामं सुरु असून एप्रिल पर्यंत पूर्ण होतोय. माणगाव-इंदापूर बायपास सोडला तर मे पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण कामं पूर्णत्वाला गेलेले असेल. गांधारपाले येथे पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अजूनही सुधारणा करू.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande