
परभणी, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।
मराठवाडा हायस्कूल, शिवाजीनगर येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण व ज्ञानमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संतोषराव धारासुरकर होते, तर प्रमुख उपस्थिती सहसचिव तथा मुख्याध्यापक अनंतजी पांडे यांची होती. प्रमुख वक्ते म्हणून अतुल देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात महान शास्त्रज्ञ C. V. Raman यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी “विज्ञानाने शिका” हे गीत सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला. प्रमुख वक्त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन केले. विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली तसेच आकर्षक भिंतीपत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर विविध वर्गांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे शंभर विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके सादर केली. एकूणच राष्ट्रीय विज्ञान दिन प्रेरणादायी व उत्साहात साजरा झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis