
रत्नागिरी, 28 फेब्रुवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम ५९ पोटकलम ३ अन्वये पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक ९ मार्च २०२६ रोजी होणार असून संबंधित पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका घेण्याकरिता पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंडणगड-पिठासन अधिकारी-सहा. जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रत्नागिरी स्थळ- राजमाता जिजाऊ सभागृह, पं. स. मंडणगड. दापोली- पिठासन अधिकारी उपविभागीय अधिकारी, दापोली स्थळ-छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. दापोली,.खेड- पिठासन अधिकारी उपविभागीय अधिकारी खेड स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. खेड. चिपळूण पिठासन अधिकारी- उपविभागीय अधिकारी, चिपळूण स्थळ-छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं.स. चिपळूण. गुहागर पिठासन अधिकारी तहसिलदार, गुहागर स्थळ-छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पं. स. गुहागर. रत्नागिरी- पिठासन अधिकारी-उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी स्थळ-लोकनेते शामराव पेजे सभागृह, पं. स. रत्नागिरी. संगमेश्वर पिठासन अधिकारी-जिल्हा पुर्नवसन अधिकारी, रत्नागिरी स्थळ-छत्रपती संभाजी महाराज सभागृह, पं.स. संगमेश्वर (देवरुख). लांजा पिठासन अधिकारी प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, रत्नागिरी स्थळ-काळे छात्रालय सभागृह, पं. स. लांजा. राजापूर -पिठासन अधिकारी-उपविभागीय अधिकारी, राजापूर स्थळ- किसान भवन सभागृह, पं. स. राजापूर
सदर पिठासन अधिकारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ व त्याखालील नियमातील १८ तरतूदी नुसार ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता संबंधित स्थळी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावून त्या बैठकीमध्ये पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती यांची निवडणूक घ्यावयाची आहे, असे उप जिल्हाधिकारी (सा.प्र.) विश्वजित गाताडे यांनी आदेशित केले आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम ५७ (३) नुसार जिल्हयांतील नवनिर्वाचित सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहेत.
पंचायत समित्यांच्या नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियमाच्या कलम ६७ व ६८ अन्वये विहीत केलेल्या पध्दतीनुसार पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती यांची निवडणूक घेण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी