परभणी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड १८ मार्चला
परभणी, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बैठक येत्या १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात होणार आहे. या बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिका
परभणी जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड १८ मार्चला पिठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव यांची नियुक्ती


परभणी, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।

परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बैठक येत्या १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद सभागृहात होणार आहे. या बैठकीस पिठासीन अधिकारी म्हणून शोभा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीआदेश जारी केले. वर्ष २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर आता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ आणि संबंधित नियमांनुसार ही निवड बैठक होणार आहे. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर भारतीय जनता पक्ष ने दावा केला असून अंतिम निर्णय निवड बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande