पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी कर्ज घेण्यास राज्य सरकारची मंजूरी
पुणे, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी हुडको किंवा इतर वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याजदराने हे कर्ज घेण्यास राज्य सरकारने शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
Air Plane


पुणे, 28 फेब्रुवारी (हिं.स.)।

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी हुडको किंवा इतर वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याजदराने हे कर्ज घेण्यास राज्य सरकारने शुक्रवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) परवानगी दिली.

त्यामुळे लवकरच कर्जांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यानंतर भूसंपादनाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या या विमानतळासाठी सुमारे तीन हजार एकर जागेची आवश्यकता आहे.

भूसंपादनासाठी कर्ज घेण्यास राज्य सरकारने मान्यता देण्याबरोबरच या कर्जास हमीसुद्धा दिली आहे. त्यामुळे विमानतळाच्या भूसंपादनाच्या कामास गती मिळाली आहे. सरकारने कर्जमंजुरी देताना मात्र काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande