
रत्नागिरी, 28 फेब्रुवारी, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड हे त्या सोळा मार्च रोजी होणार आहे.
जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष 'मिनी मंत्रालया'च्या चाव्य कोणाकडे जाणार, याकडे लागले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीचा कार्यक्रम निश्चित झाला असून, प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी दिलेल्या निर्देशानुसार, नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक २० मार्च २०२६ पूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवड ९ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड १६ मार्च रोजी होणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. या बैठकीनंतरच जिल्ह्याच्या सत्तेच्या खुर्चीवर कोणाची वर्णी लागणार, हे स्पष्ट होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी