रणजी ट्रॉफी : जम्मू आणि काश्मीरने इतिहास रचत पहिल्यांदाच पटकावले अजिंक्यपद
बंगळुरु, 28 फेब्रुवारी (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरने रणजी करंडक जिंकून इतिहास रचला. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे कर्नाटकविरुद्धचा हा सामना जिंकला. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी घेतली होती. पाचव्या दिवशी जम
जम्मू आणि काश्मीरचा विजयी संघ


बंगळुरु, 28 फेब्रुवारी (हिं.स.)जम्मू आणि काश्मीरने रणजी करंडक जिंकून इतिहास रचला. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे कर्नाटकविरुद्धचा हा सामना जिंकला. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात २९१ धावांची आघाडी घेतली होती. पाचव्या दिवशी जम्मू आणि काश्मीरने दुसऱ्या डावात चार विकेट गमावून ३४२ धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी ६३३ धावांवर पोहोचली. जम्मू आणि काश्मीरचा कर्णधार पारस डोग्राने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी दिवसाचा खेळ संपविण्यास सहमती दर्शविली आणि सामना अनिर्णित राहिला. अशा प्रकारे, जम्मू आणि काश्मीरने ऐतिहासिक विजय नोंदवला.

जम्मू आणि काश्मीरकडून, आकिब नबी दारने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या, तर दुसऱ्या डावात सलामीवीर कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा यांनी उत्कृष्ट भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १९७ धावांची भागीदारी केली. इक्बाल ३११ चेंडूत १६ चौकार आणि तीन षटकारांसह १६० धावांवर नाबाद राहिला, तर साहिल २२६ चेंडूत आठ चौकार आणि तीन षटकारांसह १०१ धावांवर नाबाद राहिला.

जम्मू आणि काश्मीरने पाचव्या दिवशी ४ बाद १८६ धावांवर आपला दुसरा डाव सुरू केला. कर्नाटकच्या गोलंदाजांना पाचव्या दिवशी विकेटची खूप गरज होती. इक्बाल आणि साहिलने जम्मू आणि काश्मीरची जबाबदारी घेतली आणि कर्नाटकच्या गोलंदाजांना सामन्यात परतण्याची कोणतीही संधी दिली नाही. पहिले सत्र पूर्णपणे इक्बाल आणि साहिल यांच्याकडे होते. इक्बालने प्रथम शतक झळकावले आणि त्यानंतर साहिलही मागे नव्हता. दोन्ही फलंदाजांनी लंच ब्रेकपर्यंत कर्नाटकला एकही विकेट घेऊ दिली नाही. परिस्थिती इतकी वाईट होती की कर्नाटकच्या गोलंदाजांना पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ही भागीदारी मोडता आली नाही आणि सामना अनिर्णीत राहिला. कर्नाटककडून प्रसिद्ध कृष्णाने दोन विकेट्स घेतल्या, तर विजयकुमार विशाख आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

कर्नाटकातील हुबळी येथील डीआर बेंद्रे क्रिकेट स्टेडियमवर आठ वेळा विजेता कर्नाटकचा संघ आणि पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेले जम्मू आणि काश्मीर मैदानावर उतरले तेव्हा कर्नाटकला स्पष्टपणे एक मजबूत दावेदार मानले जात होते. कर्नाटक संघात अनेक अनुभवी भारतीय क्रिकेटपटू होते. केएल राहुल, प्रसिद्ध कृष्णा, मयंक अग्रवाल, करुण नायर आणि देवदत्त पडिकल (कर्णधार) अशा अनुभवी क्रिकेटपटूंचा भरणा या संघात होता. पण जम्मू आणि काश्मीर संघाने त्यांचे सूत्र सोपे ठेवले. संपूर्ण स्पर्धेत, संघ स्टार संस्कृतीवर अवलंबून राहिला नाही किंवा त्यांच्या दबावाला बळी पडला नाही.

२०२६ मध्ये रणजी ट्रॉफी मोहिमेच्या पहिल्या सामन्यात, जम्मू आणि काश्मीरने मुंबईला कठीण आव्हान दिले, कर्णधार पारस डोग्राने शानदार शतक (१४४ धावा) झळकावले. मुंबईविरुद्ध दुसऱ्या डावात कामरान इक्बाल लोनने अर्धशतक झळकावले, त्यानंतर अंतिम सामन्याच्या शेवटच्या डावात शतक झळकावून मुंबईचा पराभव भरून काढला.

जम्मू आणि काश्मीरचे प्रशिक्षक अजय शर्मा, माजी भारतीय क्रिकेटपटू, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर म्हणाले होते, आमच्याकडे २५-३० गुणवान क्रिकेटपटूंचा कोर गट आहे. येथे कोणतीही स्टार संस्कृती नाही. प्रत्येकजण कठोर परिश्रम करतो. आम्ही सामन्यासाठी सर्वात योग्य असलेल्या क्रिकेटपटूंना संधी देतो.

या विजयात जम्मू आणि काश्मीर संघाचे प्रशिक्षक अजय शर्मा आणि गोलंदाजी प्रशिक्षक कृष्णा कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये ६८ च्या सरासरीने ३८ शतके आणि ३६ अर्धशतके झळकावणाऱ्या शर्माला सुरुवातीला जम्मू आणि काश्मीर संघात स्थिरावण्यासाठी संघर्ष करावा लागला. सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मिन्हास यांच्यासोबत, अजय संघाशी संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आणि त्याचे परिणाम संपूर्ण स्पर्धेत दिसून आले.

राजस्थानचा रहिवासी असलेल्या कृष्णा कुमार यांनी संघाच्या वेगवान गोलंदाजीची कौशल्यपूर्ण रचना केली आहे. दुखापती व्यवस्थापनापासून ते सामन्यांमध्ये प्रत्येक विकेटसाठी दृष्टिकोन विकसित करण्यापर्यंत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा जवळजवळ २० वर्षांचा कोचिंग अनुभव त्याच्या संघासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे आणि २९ वर्षीय जम्मू आणि काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी रणजी ट्रॉफी हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे, त्याने ६०हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

१९५९-६० च्या हंगामात जम्मू आणि काश्मीरने पहिल्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेतला आणि तेव्हापासून ते एक मजबूत दावेदार मानले जात नव्हते.

या हंगामापूर्वी, जम्मू आणि काश्मीरने ३३४ रणजी सामने खेळले होते, त्यापैकी फक्त ४५ सामने जिंकले होते. १९८२-८३ मध्ये त्यांनी सर्व्हिसेसविरुद्ध पहिला विजय मिळवण्यासाठी त्यांना ४४ वर्षे लागली.नॉकआउटमध्ये पोहोचणे त्यांच्यासाठी कधीच सोपे नव्हते. पण २०१३-१४ मध्ये त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये पोहोचून एक मोठी कामगिरी केली आणि नेट रन रेटवर गोव्याला मागे टाकले. २०१५-१६ मध्ये, त्यांनी परवेझ रसूल यांच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर मुंबईला पराूत करत त्यांचा सर्वात मोठा विजय नोंदवला.या हंगामात, प्रशिक्षक अजय शर्मा आणि कर्णधार पारस डोग्रा यांच्या नेतृत्वाखाली, जम्मू आणि काश्मीरने त्यांच्या आत्मविश्वासाचे परिणामांमध्ये रूपांतर केले आणि विजेतेपद पटकावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande